Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इगतपुरीतील जिंदल समूहाच्या कंपनीत भीषण आग, काही कामगार होरपळून जखमी

Spread the love

नाशिकजवळ असलेल्या इगतपुरीतील मुंढेगावजवळ जिंदाल समूहाच्या कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला आहे. जिंदाल समूहाच्या पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. आगीमध्ये काही कामगार गंभीर जखमी झाले असून काही कर्मचारी आत अडकल्याचे वृत्त आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे हे रवाना झाले आहेत.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीत भीषण आग लागली आहे. जिंदालच्या अग्निशमन विभागासह महिंद्रा अँड महिंद्रा, घोटी टोलनाका येथील अग्निशमनच्या बंबांकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक महापालिकेचे बंबही आग नियंत्रणात आणण्यासाठी मुंढेगावकडे रवाना झाले असून नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे. कंपनीत लागलेली भीषण असून कंपनीतीलच काम करणारे काही कामगार होरपळून जखमी झाल्याचे वृत्त आहे पण अद्यापही आगीचे कारण समजू शकलेले नाही. कंपनीला भीषण आग लागल्याने छोटे छोटे स्फोट होत असल्याचे वृत्त आहे.

 

 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकारीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!