Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : रशियन विमान कोसळले, 50 प्रवाशांचा मृत्यू , तासाभराच्या शोध मोहिमेनंतर सापडले अवशेष….

Spread the love

नवी दिल्ली : गुरुवारी (२४ जुलै) रोजी एक रशियन प्रवासी विमान बेपत्ता झाले होते, परंतु आता विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या प्रवासी विमानात ५० जण होते. अंगारा एअरलाइन्सचे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते, परंतु त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. आता रशियन माध्यमांनी असा दावा केला आहे की विमानाचा अवशेष सापडला आहे.

रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सच्या वृत्तानुसार, रशियाचे An-24 प्रवासी विमान टिंडा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्या प्रयत्नासाठी ते आकाशात फिरत होते आणि नंतर बेपत्ता झाले. प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह म्हणाले की, सुरुवातीच्या माहितीनुसार, विमानात पाच मुलांसह ४३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.

पायलटच्या चुकीमुळे विमान कोसळले का?

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, विमान पायलटच्या चुकीमुळे कोसळले. दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नात खराब हवामानामुळे त्याला काहीही स्पष्ट दिसत नव्हते आणि म्हणूनच हा अपघात झाला.

सायबेरियातील अंगारा एअरलाइन्सचे हे विमान सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. त्याच्या शेपटीच्या क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बनवल्याचे दिसून येते. बचाव पथक हेलिकॉप्टरद्वारे विमानाचा शोध घेत होते, तेव्हा विमानाचा पुढचा भाग जमिनीवर जळताना दिसला. हे पाहून बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

विमान अपघाताबाबत विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, पायलट दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अच्जनक अंगारा एअरलाइन्सचे हे विमान अचानक रडारवरून गायब झाले. त्यानंतर या प्रवासी विमानाचा एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर या विमानासाठीची शोध मोहीम सुरू झाली होती. अखेर तासाभरानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली.

50  प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी

सदर अपघातग्रस्त  विमान रशियाच्या पूर्व अमूर प्रदेशात होते तेव्हा त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. अंगारा एअरलाइन्सच्या An-24 विमानाच्या अपघातानंतर, या अपघातात 50  प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. विमान त्याच्या गंतव्यस्थानापासून थोड्या अंतरावर असतानाच कोसळले. समोर आलेल्या माहितीनुसार, 43 प्रवाशी आणि सहा क्रू कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 बालकांचा समावेश आहे.

स्थानिक आपत्कालीन विभागाने सांगितले की सायबेरियास्थित अंगारा एअरलाइन्सचे हे विमान अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ येत असताना रडार स्क्रीनवरून गायब झाले. प्रादेशिक राज्यपाल वसिली ऑर्लोव्ह यांनी सांगितले की AN-24 प्रवासी विमानात पाच मुले आणि सहा क्रू सदस्यांसह 43 प्रवासी होते. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर, बचाव आणि शोध मोहीम वेगाने राबवण्यात आली आणि त्याचा मलबा सापडला.

An-24 विमानाची विशेषता  काय?

AN-24 चे पूर्ण नाव अँटोनोव्ह-24 आहे. सोव्हिएत बनावटीचे मध्यम-श्रेणीचे डबल-इंजिन टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे. हे प्रामुख्याने कमी अंतराच्या उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे आणि प्रादेशिक उड्डाणांसाठी वापरले जाते. ते पहिल्यांदा 1959 मध्ये उड्डाण केले होते आणि रशिया, पूर्व युरोप आणि आशियातील कठीण भागात उड्डाण करण्यासाठी डिझाइन केले होते. हे विमान सुमारे 1500 ते 2000 किलोमीटर उड्डाण करू शकते. त्यामुळे या विमानाचा वापर स्थानिक, प्रादेशिक पातळीवर केला जातो. त्याची खासियत म्हणजे ते लहान धावपट्ट्यांवरून उड्डाण आणि उतरू शकते, ज्यामुळे ते दुर्गम आणि डोंगराळ भागांसाठी योग्य समजले जाते. त्याच्या मजबूत आणि विश्वासार्ह डिझाइनमुळे, ते मालवाहू विमान आणि लष्करी वाहतूक म्हणून देखील वापरले जाते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!