पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक खास ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक आज दादर येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर येणार आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही याठिकाणी उपस्थित राहणार असून आज संध्याकाळी षणमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि अमोघ वकृत्त्वाची देणगी लाभली होती. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले होते, असे पंतप्रधान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Remembering Balasaheb Thackeray Ji on his birth anniversary. I will always cherish my various interactions with him. He was blessed with rich knowledge and wit. He devoted his life to public welfare.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2023
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र कुलाब्यातील रिगल सर्कल येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे संध्याकाळी ७ वाजता हजर राहणार असल्याचे शिवसेनेने गुरुवारी जाहीर केले. सेंट्रल हॉलमधील बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला राज ठाकरे आणि निहार ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055