Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : क्रिकेटपटू रिषभ पंतच्या गाडीला मोठा अपघात , १०८ रुग्णवाहिकेने पोहोचवले रुग्णायालात …

Spread the love

देहरादून  : भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रिषभ पंत याचा शुक्रवारी दिल्ली-डेहरादून महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या दुभाजकाला रिषभच्या कारने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कार जळून खाक झाली आहे. तर रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालवत असताना डुलकी लागल्याने  अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण गेल्याच आठवड्यात रिषभला   कारची वेगमर्यादा न पाळल्यामुळे दोनवेळा ट्राफिक पोलिसांकडून दंड ठोठावण्यात आला होता.


रिषभ पंत आज पहाटे नव्या वर्षानिमित्ताने दिल्लीहून रुडकी स्थित आपल्या राहत्या घरी आईकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याची मर्सिडीज कार तो स्वत: चालवत होता. शुक्रवारी पहाटे जवळपास साडेपाच वाजताच्या सुमारास रिषभला कार चालवत असताना डुलकी लागली आणि कारवरील नियंत्रण सुटल्याने  भीषण अपघात झाला. कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. यात कारने पेट घेतला. रुरकी जवळील मोहम्मदपूर येथे हा भीषण अपघात घडला.

अपघातानंतर रिषभ पंत कारची खिडकी तोडून बाहेर आला होता. त्यानंतर स्थानिक लोकांनी रिषभची मदत केली आणि त्याला तातडीने रुग्णालयात पोहोचवले. रिषभ कारमधून बाहेर आल्यानंतर कारने  पेट घेतला होता. कार आगीच जळून खाक झाली आहे. लोकांनीच  १०८ नंबरवर फोन करुन अॅम्ब्युलन्स बोलावली आणि रिषभला रुरकी येथील सक्षम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

रिषभला दिल्लीला एअरलिफ्ट करता आले नाही …

रिषभला दिल्लीला एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु खराब हवामानामुळे थांबविण्यात आले. रस्ते मार्गेही नेण्याचा विचार झाला परंतू तिथे जाण्यासाठी कमीतकमी १० तास लागणार होते. यामुळे रिस्क घेणे योग्य वाटले नाही. यामुळे रिषभवर उत्तराखंडमध्येच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले. रिषभला सध्या एअरलिफ्ट करण्याची तातडीची आवश्यकता नाही, असे हेल्थ अपडेटमध्ये डॉक्टरांनी सांगितले आहे. परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत असलेले आमदार उमेश कुमार यांनी सांगितले की, रिषभला रुग्णालयात पाहून त्याची आई सरोज खूप घाबरली होती. सध्या तिची प्रकृती ठीक नाही, ती सतत रिषभसोबतच आहे.

असेही  सांगण्यात येत आहे की , ऋषभने  कार चालवताना सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे अपघातानंतर एअरबॅग्स उघडल्या नाहीत. सीटबेल्ट न लावल्याने  पंतला जास्त इजा झाली. त्याला सुरुवातीला रुरकीतील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. पंतवर सध्या उपचार सुरू आहेत. पंतच्या कारला झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा सीट बेल्टचा विषय चर्चेत आला. पंतने सीट बेल्टचा वापर केला असता, तर अपघातानंतर कारमधील एअरबॅग्स उघडल्या गेल्या असत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!