Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद : एकूण रुग्णांची संख्या 958 तर 29 मृत्यू , 255 जण कोरोनामुक्त

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद शहरात आज 57 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.

Advertisements

घाटीत मागील चौदा तासांत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मागील चौदा तासांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबादेतील शंभू नगर, गल्ली नं.29 येथील कोरोनाबाधित असलेल्या 35 वर्षीय महिलेचा आज सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच संजय नगरातील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 45 ‍मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर जलाल कॉलनी येथील 32 वर्षीय पुरूष रुग्णाचा 16 मे रोजी रात्री 9 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही कळविण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!