Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#coronaVirusUpdate : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८५ हजाराच्या वर , २७५२ जणांचा मुत्यू , ५३०३५ उपचारांनंतर घरी…

Spread the love

देशातील करोना रुग्णांची ही ८५, ९४० इतकी झाली आहे. यातील ३०१५३ जण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत करोनाने एकूण २७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ५३०३५ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. मोदी हे माझे चांगले मित्र आहेत, असं ट्रम्प म्हणाले. करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ट्रम्प यांनी भारताला मोफत व्हेंटिलेटर देऊ केल्याने मोदींनी त्यांचे आभार मानले.

केंद्र सरकारने शनिवारी नॉन-मेडिकल आणि नॉन-सर्जिकल मास्कच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. कॉटन, सिल्क आणि इतर कापडापासून बनवलेले हे मास्क असतील. एन-९५ आणि सर्जिकल मास्कच्या निर्यातीवर बंदी कायम आहे. कापड निर्यातदार कॉटन, सिल्क आणि इतर प्रकारच्या मास्कच्या निर्यातीची मागणी करत होते. सरकारच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय. आमच्याकडे मागणी वाढली आहे. पण बंदीमुळे व्यवहार ठप्प होता. पण परवानगी दिल्याने व्यवहाराला चालना मिळाली आहे. या व्यवहारातून पुढच्या तीन महिन्यात एक अब्ज अमेरिकी डॉलरची निर्यात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला  मैत्रीपूर्वक मदतीचा हात

जगात सर्वत्र आणि भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून  कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतापुढे  मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची मोठी घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली होती . त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘मित्र राष्ट्र असलेल्या भारताला अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स दान करण्याची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आम्ही आहोत. मैत्रीपूर्ण संबंध असलेला भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा पराभव करू. यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत.’ कोरोना व्हायरसविरुद्ध लस विकसित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. भारत आणि अमेरिका दोन्ही देश ही लस विकसित करण्याचं कार्य करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!