एसटी बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने भीषण अपघात ३० प्रवाशी जखमी

मंगळवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीतील ३० प्रवाशी जखमी झाले असून १४ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने लातूरला हलवण्यात आले असून या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आज सकाळी लातुर-पुणे-वल्लभनगर ही एसटी निलंगा आगारातून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मुरुड जवळील बोरगाव काळे येथील पुलावरून एसटी बस खाली उतरली. ही बस जोरात आदळल्याने बसचे पुढील काच पूर्णपणे फुटली चालकाला दुखापत झाली आहे. बस पुलावरून खाली कोसळताच बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. यामुळे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एसटीचा अपघात झाल्यानंतर प्रवाशी आतमधून बाहेर आले. अनेकांना दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील काही प्रवाशी शेजारीच पडून होते. या परिसरातील लोकांना अपघात झाल्याचे समजताच त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेला बोलावून जखमींना तातडीने उपचारासाठी मुरूड रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्वपदावर आणली.
लातूर – मुरुड अकोला हा रस्ता खूपच अरुंद असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. शिवाय या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाचे काम होत नसल्याने या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड, अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी घोषित
#STBusAccident #Accident #busAccident #Mahanayak #MahanayakOnline
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055