मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ९ जण जागीच ठार
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गाडीमधील नऊ जण जागीच ठार झाले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास माणगावच्या रेपोली गावाजव्हळ ही दुर्घटना घडली आहे. या धडकेत कार पूर्णपणे चक्काचूर झाल्यामुळे कारमध्ये बसलेल्या ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवर माणगाव जिव्हाळील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ ट्रक व इको कारची समोरासमोर टक्कर झाली या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी असून त्याला माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिपळूण जवळील लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी न MH- 48 BT8673 यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे. इको व्हॅन मध्ये एकूण दहा जण होते. या अपघातामध्ये पाच पुरुष तीन महिला आणि एका लहान मुलगी असे ९ जण मयत झाले आहेत. या कुटुंबातील चार वर्षांचा चिमुरडा या भीषण अपघातामधून बचावला असून उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले आहे. रायगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे, असे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे. या अपघातामधून कारमधून प्रवास करणारे मुंबईतील जाधव कुटुंबीय व सर्वजण मालाड आणि बोरिवली परिसरात राहत होते. नातेवाईकाच्या वर्षश्राद्धासाठी हे सर्वजण गावी निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा अपघात झाला.
अपघातामधील मृतांची नावे :
- अमोल रामचंद्र जाधव (वय ४०) हेदवी
- दिनेश रघुनाथ जाधव (वय ३६) हेदवी
- कांचन काशिनाथ शिर्के (वय ५०)
- नंदिनी निलेश पंडित (वय ३५) डावखोत
- निलेश पंडित (वय ४२) डावखोत
- अनिता संतोष सावंत (वय ५५) सावंतवाडी
- मुद्रा निलेश पंडित (वय १२) डावखोत
- लाड मामा (वय ५८) डावखोत
- निशांत शशिकांत जाधव (वय २३)
- भव्य निलेश पंडित (जखमी)
#Mumbai #Maharashtra #Maharashtrapolitics #MahanayakOnline #MahanayakNews #NewsUpdate #CurrentNews
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055