Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड, अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी घोषित

Spread the love

संयुक्त राष्ट्राने लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयानंतर अब्दुल मक्कीची संपत्ती जप्त करण्यात येणार असून प्रवासबंदी तसेच शस्त्र बाळगण्यावर बंदी असे निर्बंध त्याच्यावर लादण्यात येणार आहेत. अब्दुल रहमान मक्की यांना UNSC मध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्याची अमेरिका आणि भारत सातत्याने मागणी करत होते त्यामुळे दहशतवादी कारवायांना रोखण्याच्या प्रयत्नात भारताला हे मोठे यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अल कायदा निर्बंध समितीने अब्दुल मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मक्की हा लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज मोहम्मह सईद याचा मोहुणा आहे. ही घोषणा करताना मक्की तसेच एलईटी, जेयूडी संघटनेतील लोक दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे, संघटनेत तरुणांची भरती करणे, तरुणांना हिंसा करण्यास भडकावणे, भारतात दहशतवादी हल्ले घडवणे अशा कारवायांत सहभागी असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्राने नोंदवले.

भारता आणि अमेरिकाची पूर्वीपासूनच मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केले जावे अशी मागणी होती. जून महिन्यात अमेरिका आणि भारताने मक्कीला दहशतवादी घोषित करावे, अशा मागणीचे संयुक्त निवेदन देखील दिले होते. मात्र चीनने ऐनवेळी या मागणीला विरोध केला होता. मात्र आता भारताच्या प्रयत्नांना यश आले असून मक्कीला आता जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मक्की कोण आहे आणि त्याला जागतिक दहशतवादी घोषित का केले?

२०१९ मध्ये ३५ वर्षांसाठी तुरुंगात जाईपर्यंत, मक्की प्रामुख्याने हाफिज सईदशी मोहुणा म्हणून ओळखला जात होता. मक्कीला १५ मे २०१९ रोजी पाकिस्तान सरकारने अटक केली होती. तो लाहोरमध्ये नजरकैदेत आहे. २०२० मध्ये, मक्कीला पाकिस्तानी न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावली होती. मक्कीचा, दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे, संघटनेत तरुणांची भरती करणे, तरुणांना हिंसा करण्यास भडकावणे, भारतात दहशतवादी हल्ले घडवणे यात कायम सहभाग होता.

लष्कराने भारतात केलेले मोठे हल्ले :

मक्कीने लष्कर आणि जमात-उद-दावामध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत भारतातील मोठ्या हल्ल्यांमागे हाफिज सईदसोबत मक्कीचाही हात असल्याचे मानले जात आहे. लष्कराने भारतात हे मोठे हल्ले केले आहेत:

  • रामपूर हल्ला: १ जानेवारी २००८ रोजी लष्कराच्या ५ दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये ७ सीआरपीएफ जवान आणि एका रिक्षाचालकाला जीव गमवावा लागला.

 

  • २६/११ रोजी मुंबईत लष्कराने हल्ला केला होता. अरबी समुद्रातून १० दहशतवादी मुंबईत घुसले होते, या लोकांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १७५ जणांचा मृत्यू झाला होता.

 

  • श्रीनगर हल्ला: १२-१३ फेब्रुवारी २०१८ रोजी, श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये लष्कराचा एक आत्मघाती हल्लेखोर घुसला. यादरम्यान एक जवान शहीद झाला. तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

 

  • बारामुल्ला: बारामुल्लामध्ये ३० मे २०१८ रोजी लष्कराच्या दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती.

 

  • श्रीनगर हल्ला: १४ जून २०१८ रोजी रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी आणि दोन सुरक्षा रक्षकांना लष्कराच्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले.

 

  • बांदीपोरा हल्ला: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराच्या दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, त्यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले.

 

CourtNewsUpdate : अंत्यसंस्काराला मज्जाव; ‘अॅट्राॅसिटी’ मध्ये जुजबी कारवाई, खंडपीठाची कारणे दाखवा नोटीस


#MahanayakNews #NewsUpdate #Internationalnews #Currentnews #Currentnewsupdtae #Newsupdate

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!