एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून तरुणीला मिठी, दोघांचा मृत्यू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थाने औरंगाबदमध्ये २१ नोव्हेंबर रोजी एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत तरुणीला मिठी मारल्याची घटना घडली होती. प्रियकराचा मृत्यू त्याच रात्री झाला होता. तर ५७ दिवसांनी तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
पूजा कडुबा साळवे (वय २८ वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर गजानन खुशलराव मुंडे (वय २९ वर्षे) असे मृत प्रियकराचे नाव आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात गजानन, तर शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात पूजा शिक्षण घेत होती. नित्याप्रमाणे २१ नोव्हेंबर रोजी पूजा विभागात गेली होती. दरम्यान तिचा पाठलाग करत गजानन देखील तेथे पोहोचला. त्याने बॅगमधील पेट्रोलची बाटली काढून स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतले व थोडे पेट्रोल इतरत्र फेकले, त्यानंतर स्वतःजवळील लायटरने स्वतःला जाळून घेतले. तिथे उपस्थित असलेल्या महिला प्राध्यपकाने पूजाला पळून जाण्यास सांगितले मात्र गजाननने दरवाजा आतून बंद करून पूजाला मिठी मारली. यामध्ये दोघेही गंभीररित्या जळाले होते. आरडाओरड झाल्याने विभागातील इतर कर्मचारी-अधिकारी धावून आले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याच रात्री उपचारादरम्यान गजाननचा मृत्यू झाला होता. ५७ दिवसांपवून पूजावर रुग्णाल्यात उपचार सुरु होते मात्र तिचा देखील मृत्यू झाला आहे.
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#AurangabadCrime #CrimeNews #NewsUpdate #MahanayakOnline #MahanayakNews
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055