Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने औरंगाबादेत विविध कार्यक्रम

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने परशुराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी दिली आहे.

नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसारउद्या मंगळवारी सकाळी 10.30 वा शरणापूर  दौलताबाद रोड दत्तमंदिर परिसर येथे परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व जन्म आरती प्रसाद व त्याच दिवशी संध्याकाळी 6 ते 10 गुलमंडी स्थानी मिरवणूक मार्ग भव्य स्टेज तेथे प्रत्येक मंडल वाद्यपदक ह्यांचा परशुराम एक्रेलिक मूमेंट देऊन सत्कार पूरी, भाजी, पुलाव… बूंदी लाडू पाणी वाटप………..

दिनांक 8 रोजी श्रीराम मंदिर समर्थनगर वरद गणेशमंदिर मागे संध्याकाळी 6 ते 8 श्लोक पठन स्पर्धा व निबंध स्पर्धा वय गट 5 ते 10 व 11 ते 15,  नंतर दि 10 मे रोजी  कलश मंगल कार्यालय क्रांती चौक येथे स्त्रियांचा आवडता खेळ (खेळ पैठणीचा) व लहान मुलांची देवी देवता रूप स्पर्धा वेळ संध्याकाळी 6 पासून सुरु होईल.

या सर्व कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुधीर नाईकयांच्यासह सुचेता पालोदकर (महिला जिल्हाध्यक्ष)  प्रकाश महाजन (प्रमुख शहर संघटक) अंजली गोरे ( महिला संघटक) स्मिता नगरकर (सचिव) किरण शर्मा, संजय टोनपे, धनंजय पालोदकर (व्यापारी जिल्ह्या संघटक) गायत्री न्यायाधीश, दीपक कुलकर्णी, धनंजय ब्रह्मपुरकर, सतीश जोशी, अश्विनी कुलकर्णी, स्मिता जोशी, सीमा नांदापुरकर, सुहास ठोसर, संदीप बेदरकर, रश्मि ढापरे, वर्ष्या कुलकर्णी, कुणाल वैद्य, उदय जोशी, आकाश हरसुलकर, मीना महाजन, अंजली पराड़कर, प्राजक्ता तांबोळी, मयूरी जोशी, चंद्रशेखर देशपांडे आदींनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!