Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsUpdate : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की, पोलिस आयुक्तांनी घेतली दखल

Spread the love

औरंगाबाद – बुधवारी रात्री ९.३०वा. सेव्हनहिल गॅस पंपावर पत्रकार नितीश गोवंडे आणि गणेश खेडकर यांना पुंडलिकनगर पोलिसांनी जबरदस्ती पोलिस व्हॅन मधे बसवून पोलिस ठाण्यात आणंत तुच्छ वागणूक दिली.या प्रकरणी पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी दखल घेतल्यानंतर पत्रकारांना मुक्त करण्यात आले.
शिंदे आणि अन्य एक जण अशा दोन पोलिसांनी पत्रकारांना तुच्छतेची वागणूक दिली.

सेव्हनहिल गॅस पंपावर काही गुंड वाहनचालक रोजफुकट गॅस भरुन नेतात आज त्याच गुंडांना फुकट गॅस न मिळाल्यामुळे पंपावरील कर्मचार्‍यांना त्या गुंडांनी मारले या प्रकाराची माहिती पत्रकार नितीश गोवंडे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कळाली. म्हणून ते प्रकरण का घडले हे पाहण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.त्याचवेळी पत्रकार गणेश खेडकरही त्या ठिकाणी आले.पुंडलिकनगर पोलिससही आले होते.त्यांनी गोवंडे व खेडकर यांना गर्दी करु नका म्हणून हाकलले.शिंदे नावाच्या पोलिस कर्मचार्‍याला जेंव्हा गोवंडेंनी सांगितले.पत्रकार असल्याचे त्यामुळे शिंदेअधिकच चिडला व खेडकर आणि गोवंडेला गाडीत बसवून पोलिस ठाण्यात पाठवले.

दरम्यान गोवंडेंनी पोलिसआयुक्त डाॅ.गुप्ता यांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे व सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे पाटील  घटनास्थळी पाठवले. त्यांनी परिस्थिती निंत्रणात आणली आणि खेडकर आणि गोवंडे यांना सोडून देण्यात आले.

विशेष म्हणजे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डें यांनीही पत्रकारांना दादागिरी करणार्‍या पोलिसांची नावे  सांगण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांना पत्रकारांचे शिष्ठमंडळ उद्या भेटणार असल्याचे गोवंंडे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!