Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : सेंट्रल बॅंक आॅफ इंडीयाच्या अधिकार्‍यांकडून खातेदारांच्या पैशाचा अपहार

Spread the love

औरंगाबाद – सेंट्रल बॅंक आॅफ इंडीया मधील अधिकार्‍यांनी खातेदाराचे अडीच लाख रु. लंपास केल्याप्रकरणी ५ जणांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.फेब्रुवारी २० मधे बॅंकेचे खातेधारक चरणकुमार गवळी यांनी त्यांच्या खात्यातून अडीच लाख रु वेगवेगळ्या इतर खात्यात वळवले गेल्याची तक्रार बॅंकेच्या विभागिय व्यवस्थापकाकडेादिली होती. त्यानुसार बॅंकेने चौकशी समिती स्थापन करुन गवळी यांच्या अपहार करण्यात आलेल्या प्रकरणाचा शोध लावला.

या मधे बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक अविनाश तेरकर यांच्या खात्यात २७हजार, दिपक गोपाळकृष्ण शास्री ९५हजार,विद्या अविनाश तेरकर ४९हजार,अविनाश तेरकर ४९हजार,तसेच श्रीकांत कुलकर्णी यांच्या खात्यात ३०हजार रु. जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.समितीच्या अहवालावरुन विभागिय व्यवस्थापक विनोदकुमार बालकृष्ण यांनी क्रांतीचौक पोलिसांकडे तक्रार देत वरील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!