Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : विक्रीसाठी आणलेल्या गावठी कट्ट्यासह तिघे जेरबंद,

Spread the love

औरंगाबाद – हिनानगर परिसरात रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणलेले गावठी कट्टे पोलिसआयुक्तांच्या विशेष पथकाने काडतूसासह जप्त केले आहेत.व तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.तिघांच्या ताब्यातून ३लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कपील जोगदंड (२५) रा.न्यायनगर, अभिजित मधुकर वाघमारे(२२) रा.बोरगावतारु, भोकरदन व बाळू दगडूबा खिल्लारे(२४) रा.टाकळी भोकरदन अशी अटक आरोपींची नावे आहेत. कपील जोगदंडवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोन /तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.दोन गावठीाकट्टे ,दोन जिवंत काडतुसे, दोन मोटरसायकल आणि ४मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल रोडे यांनी आरोपींना एम.साडको पोलिसांच्या हवाली केले आहे.

पोलिस बंदोबस्तात पुन्हा चंदनचोरी

औरंगाबाद – २४तास पोलिस पहारा असलेल्या जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या परिसरातून शनिवारी पहाटे पुन्हा चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून नेले.या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
२४तास जिल्हाधिकार्‍यांना सुरक्षारक्षक म्हणून दोन पोलिस कर्मचारी असतात.सी.सी. टि.व्ही फुटेज त्याची रेंज घटनास्थळा पर्यंत पोहोचत नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली.असे असतांनाही दर दीड दोन वर्षांनी चंदनाचे झाड त्याच निवासस्थानाच्या परिसरातून चोरी होते. यापूर्वी अशा घटना दोन ते तीनदा घडल्या पोलिसआयुक्तांच्या निवासस्थानातून, महावितरणाच्या कार्यालयातून जे की पोलिसआयुक्तालयासमोर आहे. अशा महत्वाच्या ठिकाणाहून चंदनाचे झाड चोरुन नेले जाते गुन्हे दाखल होतात.एकदा तर चोरटे पकडलेही होते म्हणे. पण हे पोलिसांचेही रुटीन असल्याचे बोलले जाते. या विषयी पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना विचारले असता तपास सुरु आहे एवढेच ते सांगू शकले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!