Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात सरकार , अशोक चव्हाणांसह सर्व मराठा आमदारांवर “अशा ” शब्दात झाली टीका … !!

Spread the love

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राज्यातील मराठा आरक्षणाच्या  मुद्द्यावरून अत्यंत शिवराळ भाषेत मराठा आमदारांची निर्भत्सना करून पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली .  पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. तर तत्कालीन सरकारची प्रशंसा केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक मराठा आमदार आहेत. पण ते विधानसभेत बोलत नाहीत. त्यांना लाज नाही. ते सर्व घरात दरवाजा लावून बसले आहेत. त्यांच्या ढुंगनावर लाथ मारा, अशा शब्दात पाटील आपला संताप व्यक्त केला.

आपल्या भाषणात नरेंद्र पाटील म्हणाले कि , तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आलं नाही. जेव्हा लाखोचे मोर्चे निघाले तेव्हा त्या काळातील विरोधीपक्षाचं आमदार-खासदार मोर्चात सहभागी झाले. अशोक चव्हाण देखील सहभागी झाले होते. पण आता सत्ता असताना, ते स्वत: उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही. अशोक चव्हाण यांनी मराठा असं नाव लावू नये, अशा शब्दांत नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. अशोक चव्हाण यांना आरक्षणाची गरज नाही. पण शेतकरी कष्टकरी कामगार यांना आरक्षण हवं आहे. याचं भान त्यांनी ठेवावं.

मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही ? : खा . संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल

छत्रपती शाहू महाराजांनी 200 वर्षांपूर्वी बहुजन समाजाला (OBC) आरक्षण मिळवून दिलं होतं. त्यांनी फक्त मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. तर त्या वेळीच्या बहुजन समाजातही मराठा समाजाचा सहभाग होता. मग, आज मराठा समाज मुख्य प्रवाहात का नाही? असा सवाल भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकरला केला आहे. संभाजीराजे यांनी नांदेड येथील मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याला संबोधित करताना सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी बुद्धिवंत लोकांची समिती स्थापन करा, असं सांगत संभाजीराजेंनीही  काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर  खोचक टीका केली. सुप्रीम कोर्टात भूमिका मांडताना या समितीचा सल्ला घ्या. इथून पुढे चुका न करण्याचा सल्ला संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान संभाजीराजे म्हणाले, माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही, तर माझा लढा संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. मी नेतृत्वासाठी बाहेर पडलो नाही, घटक म्हणून समाजासाठी काम करतो आहे. मराठा समाजाचा सेवक म्हणून काम करायचं आहे,  मराठा समाज ओबीसीविरोधात नाही, असंही संभाजी राजे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!