Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : बँक घोटाळ्याप्रकरणी ‘सक्तवसुली संचलनालया’ची अजित पवार , सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट …

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी ‘सक्तवसुली संचलनालया’ने (ईडीने) राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत ७० जणांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांचाही समावेश होता. यापैकी सुनेत्रा पवारांना याप्रकरणात आता क्लीन चिट मिळाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीला फोडून भाजपसोबत गेले होते आणि उपमुख्यामंत्रीपद मिळवले होते. 

मुंबई पोलिसांच्या हवाल्यानुसार ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांना २५,००० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) क्लीन चिट मिळाली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना क्लीन चिट मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते. घोटाळ्यावेळी जे मंत्री आणि बँकेचे अधिकारी होते त्या सर्वांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली आहेत. अशा एकूण ३०० च्यावर मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे यात आहेत.

काय होते आरोप ?

संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं

नऊ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा

गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६० कोटींचे कर्ज

केन अ‍ॅग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा

२४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५ कोटींची थकबाकी

२२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित

लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान

कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८ कोटींची थकबाकी

खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान

८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा

 

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!