Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेकाॅर्डवरच्या आरोपींना हाताशी धरुन खाजगी वाहन चालकाचा नवा उद्योग

Spread the love

भाडेतत्वावर कार घेणार्‍याचे दीड लाख रु लुटले,चार अटकेत १ लाख ३७ हजार रु.जप्त

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या अट्टल गुन्हैगारांना हाताशी धरुन भाडेतत्वावर कार घेणार्‍या ग्राहकाचे दीड लाख रु.लंपास करणार्‍या चौघांना ग्रामीण गुन्हेशाखा व वैजापुर पोलिसांनी अटक केली.
दिपक ढोले(२९) रा.रास्तेसुरेगाव ,येवला,धंदा खाजगी वाहन चालक कुख्यात संदीप राजपूत व अमोल मकासरे दौघेही रा.शिर्डी यांना गुन्हेशाखेने अटक केली तर मुख्य आरोपि सुनिल राहाणे रा साकुरी याला १लाख रुपयांसहित वैजापूर पोलिसांनी अटक केली आहे.
महिना भरात हा नव्या पध्दतीने केलेला दुसरा गुन्हा उघडकीस आला आहे.
याच ३ जुलै रोजी शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सचिन तायडे ने खाजगी वाहन चालकाला पैशाचे अमीष दाखवून लूटमारीचा बनाव केला होता.
असाच गुन्हा वैजापुर पोलिस ठाण्यात २१जुलै रोजी दाखल झाला आहे. राहता येथील व्यापारी जितेन पटेल यांनी २०जुलै रोजी काही इलेक्र्टीक मोटर्स आरोपीच्या पिकअप व्हॅन मधुन बुलढाण्याला विक्री केला व विक्रीचे दीड लाख रु.घेऊन परतंत असतांना दोन मोटरसायकलस्वारांनी पिकअप व्हॅन अडवत व्हॅन मधील रवी कडून दीड लाख रु.हिसकावून पळ काढला. हा गुन्हा घडल्यानंतर आरोपी दिपक ढोले(२९) रा रास्ते सुरेगाव येवला.याने २१ जुलै रोजीरितसर फिर्याद वैजापुर पोलिसांना दिली या नंतर गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी फिर्यादी ढोले आणि साक्षीदार रवी यांना वैगवैगळे बाजूला घेत गुन्हा घडल्याचा तपशील जाणून घेतला दोघांच्याही बोलण्यात विसंगती आल्यामुळे गुन्हेशाखेने आरोपींना विश्वासात घेत गुन्हा उघडकीस आणला.पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापुर पोलिसांसह पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय दुलंत, सोळंके, पोलिसकर्मचारी विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, ज्ञानेश्वर मेटे यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!