Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पोलिस आयुक्तांवरील नामुष्की टळली, मिलींद पाटील पोलिसांना शरण

Spread the love

औरंगाबाद- धनादेश अनादर प्रकरणी पोलिसांना हवा असलेला आरोपी मिलींद पाटीलला गुन्हेशाखेने शरण येण्यास भाग पाडले.आणि पोलिसआयुक्तांना खंडपीठात येऊन या प्रकरणी खुलासा करण्याची नामुष्की टळली.
२०१६ साली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी पोलिसआयुक्तांना आरोपी मिलींद पाटील याच्या प्रकरणात जातीने लक्ष घालून अटक वाॅरंट बजावण्याचे आदेश दिले होते.पण त्याची अंमलबजावणी झालीच नव्हती. हा प्रकार खंडपीठाच्या निर्दशनास आल्यावर खंडपीठाने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांना प्रत्यक्ष हजर होण्याचे आदेश न्या.घुगे आणि न्या.शेवलीकर यांच्या खंडपीठाने दिले होते.यामुळे गुन्हेशाखेने युध्द पातळीवर कष्ट घेत आरोपी मिलींद पाटील याचा आॅनलाईन छडा लावलाच.त्यामुळे आरोपी शरण आला या कारवाईत गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल देशमुख आणि विजय पवार यांनी आरोपी पाटील यास ताब्यात घेत मुकुंदवाडी पोलिसांच्या हवाली केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!