Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : काचेची बाटली फोडून केला तरुणावर प्राणघातक हल्ला, जिन्सी हद्दीत रंगा बिल्लाची दहशत

Advertisements
Advertisements
Spread the love

खून, लुटमार आणि प्राणघातक हल्ला करणा-या रंगा बिल्लाच्या जोडीने “शहर मे हमारी दहशत है ,  तू  हमारा क्या कर लेगा…”  असे म्हणत एका रिक्षाचालकावर काचेची बाटली फोडून तोंडावर वार केले. तसेच ठाण्यात  तक्रार दिली तर जिवे मारीन, अशी धमकी देणा-या शेख एजाज आणि त्याचा भाऊ शेख इस्माईलविरुद्ध जिन्सी ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कटकट गेट बाबर कॉलनीतील शेख एजाज शेख इब्राहिम व त्याचा भाऊ शेख इस्माईल शेख इब्राहिम या दोघा भावंडांवर जिन्सी  ठाण्यात  खून, प्राणघातक हल्ला करणे, लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्हेगारी कारवाया करत असल्याने पोलिसांनी त्यांना तडीपारही केले होते. दोघांची तडीपार संपली असून दोघे भाऊ सध्या कारागृहातून जामीनावर सुटलेले आहे.
किराडपुरा रहेमानिया कॉलनीतील रिक्षाचालक शेख फिरोज शेख अकबर हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सावरकर चौक ते आयबी मेस येथून प्रवासी घेऊन जात असताना शेख एजाज व त्याचा भाऊ शेख इस्माईल या दोघांनी रिक्षा अडवून त्यातील प्रवाशाना उतरवून देत फिरोज यास घरी घेऊन गेले. त्या ठिकाणी  दोघा भावांनी तेरे भाइ के पैसे छिने तो उसदिन बहोत उड रहा था, हमारी शहर मे दहशत है, हमारा कोई कुछ बिगाड नही सकता, असे म्हणत बेदम मारहाण करत काचेची बाटली फोडून त्याच्या गालावर मारले. यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जिन्सी ठाण्याचे  अफसर पठाण  यांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!