Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला बसतील जरांगेंचा सरकारला इशारा

Spread the love

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेले उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. हे आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे  जरांगे यांनी  जाहीर केले आहे. अंतरवालीसह राज्यातील आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी तसेच सगेसोयरे कायद्यासाठी आजपासून पंतप्रधान, राष्ट्रपती यांना ईमेल करा असे आवाहन जरांगे यांनी  मराठा समाजाला केले आहे.

मनोज जरांगेंनी सरकारला नवा इशारा दिल आहे, मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला बसतील असा इशारा जरांगेंनी दिला आहे.  सरकारचा सगेसोयरे विषयावर चर्चाच करायची नाही, तोडगाच काढायचा नाही असा आरोपही जरांगेंनी केला आहे.

जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल

दरम्यान, जरांगे समर्थकावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन मिनिटात अख्या ब्राह्मणांना संपवू अशी धमकी या तरुणाने दिली होती. काही दिवसांपासून तीन मिनिटात संपूर्ण ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी धमकी देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

याच प्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे या तरुणावर भा.द.वी. 153 अ व 506 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावागावात धरणे आंदोलन करा

मी त्याला एकट्याला बोललो आहे ब्राम्हण समाजाला नाही, असे स्पष्टीकरण जरांगे पाटील यांनी दिले आहे. त्यांनी धोका दिला आहे म्हणून त्यांना बोललो, मात्र तुम्ही नेत्या कडून बोलताय, तुम्ही गोर गरिबांची फसवणूक करताय असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजात गरसमज नको, काय चौकशी व्हायचा होऊ द्या, 3 मार्च पर्यंत आपण आपले कार्यक्रम स्थगित केले आहे त्याऐवजी गावागावात धरणे आंदोलन करा, असे जारंगे पाटील यांनी सांगितले आहे.

सरकारची दडपशाही सुरु आहे, गृह मंत्र्यांनी अंतरवलीत मंडप काढायचे आदेश दिले, तो मंडप मराठ्यांची अस्मिता आहे, सरकारला गृह मंत्र्याला सांगणे आहे असले चाळे बंद करा, ते काही दहशतवादी केंद्र नाही, दडपशाही बंद करा असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

तसेच आजपासून मराठे राष्ट्रपती पंतप्रधान, राज्यपाल याना ई-मेल करणार, दडपशाही थाबवा, आणि सगे सोयरे कायदा करा असा ई-मेल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शांततेत रस्ता रोको करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले

मी बेईमानी करणार नाही मी तडफडून मरेल, शांततेत रस्ता रोको करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, 10 टक्के आरक्षण विद्यार्थ्याना घेऊ द्या मात्र आमची मागणी ओबीसी मधून आरक्षण आहे असे पुन्हा एकदा जरांगे यांनी स्पष्टे केले आहे.

8 दिवस बघू शांतपणे हे काय करताय ते, मराठ्यांनी शांत राहावे, कोण काय करताय बघू. जालना एसपीला विनंती आहे, गृहमंत्री जाणूनबुजून करताय तुम्ही आणि मराठ्यांना त्रास देऊ नका.

एकूण जो अंदाज दिसतोय, षडयंत्र रचणे , ट्रॅप करणे, 10 टक्के आरक्षण घ्या म्हणून माझ्यावर दडपण आणले जात आहेत, यामुळे ते मला 100 टक्के अटक करणार. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे मला ते धरणार.

तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता

10 टक्के आरक्षण आम्ही नाकारले नाही पण ते टिकणार आहे का, त्या विरोधात याचिका दाखल झाली आहे, ते आरक्षण घात करणारे आहे. सरकारला मी काय सांगावे आरक्षण कसे टिकणार नाही, सरकारकडे अभ्यासक नाही का?

आमची मागणी ओबीसी आरक्षण, आणि सगेसोयरे कायदा बस, गृहमंत्री तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिल म्हणता त्या अटी किती जाचक बघा, फायदा झाला का बघा, सारथी चे मुलं उपोषणाला बसले आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.

तुमच्या हिताचे सांगतो शहाणपण येत असेल तर मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, मी बरं झालो की दौऱ्यावर निघणार, सध्या चालता येत नाहीए. त्यांनी माझ्या विरोधात आमदार मंत्री उभे केले, कर, होऊ दे पाणी का पाणी

मला मराठा समाज मारू देणार नाही, तुम्ही मला अटक केली तर राज्यात सगळीकडे मराठे दिसतील, सरकारने आताही यावे, चर्चा करावी तोडगा काढला असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.

माझ्या विरोधात गुन्हा दाखल करताय करु द्या, न्यायालय मला न्याय देईल मात्र त्यांनी ही आम्हाला फसवले आहे जेवढे मंत्री आले त्या सगळ्यांनी फसवले सगळ्या विरोधात आम्ही तक्रारी करणार, तुम्ही पाऊल उचला आम्ही पण सुरू करतो मग असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!