Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ ; न्यायालयाने फरार असल्याचे केले घोषित …

Spread the love

अभिनेत्री जयाप्रदा सध्या मोठ्या वादात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. जयाप्रदा यांच्या अडचणी खूप वाढल्याचं पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर आता जयाप्रदा यांना न्यायालयाने फरार घोषित करण्यात आले आहे.

2019 लोकसभा निवडणूकीच्या वेळी त्यांच्यावर आचार संहिता प्रकरणात गुन्हा रामपुरमध्ये दाखल करण्यात आला होता. ज्याची सुनावणी हे कोर्टात सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुनावणीसाठी जया प्रदा उपस्थित राहत नाहीत.

हेच नाही तर कितीतरी वेळा कोर्टाकडून समन्स जारी करण्यात आले. जया प्रदाविरोधात कोर्टाकडून वारंट जाहिर करण्यात आले आहे. तसच जमात वारंट देखील जारी करण्यात आले आहे. रामपुर पोलिस अधिक्षकांनी देखील जया प्रदा यांना कोर्टात येण्याबाबत आदेश दिले. मात्र, हे सर्व करूनही जया प्रदा कोर्टात हजर झाल्याच नाहीत.

नुकताच पार पडलेल्या मंगळवारच्या सुनावणीमध्ये कोर्टाने थेट जया प्रदा यांना फरार घोषित केले आहे. अधीक्षकांना डेप्युटी एसपीच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून 6 मार्च 2024 रोजी कोर्टात जया प्रदा यांना हजर करण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. आता एक टीम जया प्रदाचा शोध घेणार आहे.

आता हे स्पष्ट आहे की, जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी म्हटले आहे की, जया प्रदा यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंगाचे प्रकरण रामपूर येथे सुरू आहे. कितीतरी वेळा त्यांच्या विरोधात समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र, असे होऊनही त्या कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.

जया प्रदा यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे देखील तिवारी यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी जया प्रदा यांच्या विरुद्ध कलम 82 सीआरपीसी अंतर्गत कारवाई करून त्यांना कोर्टात हजर करायचे आहे. 6 मार्च 2024 रोजी त्यांना कोर्टात हजर करायचे आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!