Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक; मुख्यमंत्री सचिवालयात वापरल्या एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या आणि शिक्के

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या आणि शिक्के मुख्यमंत्री सचिवालयात वापरल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.  दरम्यान काही निवेदने उघडकीस आली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे यांची बनावट स्वाक्षर आणि शिक्के असल्याचे   आढळून आले आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास ही बाब येताच याप्रकरणी मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.दरम्यान त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली असून मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली आहे तसेच, तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांची सही आणि शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयात येतात. या निवेदनांची नोंद टपाल शाखेत होते. त्यानंतर ती ई ऑफिस प्रणालीत नोंद करण्यात येतात.

तिथून ती कागदपत्रे, निवेदने संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. बनावट सही आणि शिक्का मारल्याचे लक्षात आल्यानंतर मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!