Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahaVikasAghadi : महाविकास आघाडीकडे वंचित चा 27 जागांचा तर शिवसेनेचा 20 जागांचा प्रस्ताव, काँग्रेस – राष्ट्रवादी पवार यांचे मात्र वेट अँड वॉच !!

Spread the love

मुबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी शिवसेना ठाकरे यांनी २० तर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे २७ जागांचा प्रस्ताव समोर आघाडीसमोर ठेवला आहे. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या जागांची माहिती मात्र अद्याप उपलब्ध नाही.

विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा वाढणार की सुटणार? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे.

वंचितने म्हटले आहे की, आम्ही २७ जागांसाठी यादी दिली असून काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येईल. आम्हाला मविआमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा.

जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. १२-१२-१२-१२ च्या फॉर्म्युल्यासाठी आम्ही आग्रही नव्हतो. ज्या दिवशी पवार साहेब ठाकरे साहेब बैठकीत असतील तेव्हा बाळासाहेब आंबेडकर देखील महाविकास आघाडीच्या बैठकीला येतील, असे वांचीतचे नेते धैर्यवान पुंडकर यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील आतापर्यंत झालेल्या चर्चेत वंचितने ज्या जागांवर दावा केला आहे यामध्ये ठाकरे गटाच्या ७ जागा, काँग्रेसच्या ९ जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या ५ जागा आणि वाद असलेल्या ५ जागांचा समावेश आहे. तर ४८ पैकी एकूण वीस जागांवर निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.

वंचितच बहुजन आघाडीचा नेमका प्रस्ताव काय ?

महाविकास आघाडीकडून मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी. पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना मविआचा उमेदवार म्हणून घोषित करावे. मविआच्या उमेदवारांच्या यादीत १५ ओबीसी तर ३ अल्पसंख्याक उमेदवार असावेत, अशा ४ प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसताना ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली आहे. याशिवाय मविआच्या प्रत्येक घटकाने लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणूकीपूर्वी आणि नंतर भाजपात सामील होणार नाही, असा प्रस्ताव वंचितकडून देण्यात आला आहे.

वंचितने दावा केलेल्या 27 जागा कोणत्या?

  • अकोला

  • अमरावती

  • नागपूर

  • भंडारा-गोंदिया

  • चंद्रपूर

  • हिंगोली

  • उस्मानाबाद

  • औरंगाबाद

  • बीड

  • सोलापूर

  • सांगली

  • माढा

  • रावेर

  • दिंडोरी

  • शिर्डी

  • मुंबई साऊथ सेंट्रल

  • मुंबई उत्तर मध्य

  • मुंबई उत्तर पूर्व

  • रामटेक

  • सातारा

  • नाशिक

  • मावळ

  • धुळे

  • रावेर

  • नांदेड

  • बुलढाणा

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!