शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट; खनौरी सीमेवर आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

देशाची राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले असून, खनौरी सीमेवर आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. कनैल सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते ६२ वर्षांचे होते. पतियाळा जिल्ह्यातील अर्नो येथील रहिवासी कर्नल सिंग यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.

Advertisements

पतियाळातील राजेंद्र रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शेतकरी आंदोलनातील हा 8 वा मृत्यू आहे. पंजाबातील शेतकरी अद्यापही पंजाब-हरियाणातील शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून बसले असून, मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा 15 वा दिवस होता.

Advertisements
Advertisements

दिल्ली कूच 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले असले तरी शेतकरी संघटनांची बैठक मात्र नियमित सुरू आहे. दिल्ली मार्चसंदर्भात बुधवार 28 फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!