Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJP News Update : भाजपचे मिशन 45, 23 मतदार संघात निरीक्षकांच्या नियुक्त्या…

Spread the love

मुंबई : राज्यातील 48 पैकी 45 जागा मिळवण्याचे भाजपचे मिशन असून त्यासाठी 23 मतदार संघात त्यांनी आपले निरीक्षक नेमले आहेत. खासकरून आपल्या हक्काच्या जिंकलेल्या 23 जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने ही तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या निवडणूक निरीक्षकामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

असे आहेत निरीक्षक

  • भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईक

  • धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे

  • नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके

  • जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेर

  • रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे

  • अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे

  • जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह

  • नांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुख

  • बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक

  • लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी

  • सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ

  • माढा- भागवत कराड, प्रसाद लाड

  • सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील

  • नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे

  • भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ

  • गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील

  • वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील

  • अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी

  • दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर

  • उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर

  • उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे

  • उत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे

पक्षाच्या आदेशाप्रमाणे भाजपचे हे निरीक्षक त्या त्या मतदार संघातील स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून
त्या लोकसभा मतदारसंघात खासदाराबाबत लोकांचे मत काय आहे याचा आढावा घेतील.

त्यातून 2019 साली निवडून आलेला खासदार पुन्हा निवडुन येऊ शकतो का? आणि जर नसेल तर दुसरा कोण उमेदवार देता येईल याची माहिती पक्षाला दिली जाणार आहे. त्यानंतर उमेदवार ठरवले जाणार आहेत.

दरम्यान भाजपने लोकसभेसाठी 32 जागांची तयारी केल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते सांगत असून त्यातील 2019 साली जिंकलेल्या 23 जागांसाठी भाजप विशेष खबरदारी घेत आहे. मिशन 45 पूर्ण करायचे असेल तर 2019 साली जिंकलेल्या हक्काच्या 23 जागा हातात ठेवत इतर जागांसाठी वेगळी रणनिती भाजपची तयारी सुरू आहे.

आता भाजप या 23 जागांपैकी किती खासदारांना पुन्हा संधी देणार आणि किती खासदार बदलले जाणार ? हे निरीक्षकांच्या अहवाला नंतरच कळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!