Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मिंधे आणि फडणवीस गॅंग; सत्ताधाऱ्यांमध्ये आता गॅंगवॉर सुरु झाले आहे – उद्धव ठाकरे

Spread the love

सरकारकडून आता नुसता घोषणांचा पाऊस पडतो आहे. असे नुसते घोषणा करणारे सरकार आम्हाला नको आहे. दुष्काळात तेरावा महिना करणारे सरकार या देशाला नको आहे. एकवेळ आम्हाला इंडिया आघाडीचे मिलीजुली सरकार चालणार मात्र आम्हाला हे असे हुकुमशहा सरकार नको आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग येथील सभेत केला आहे.

ठाकरे म्हणाले, आघाडीत अनेक विचारांचे लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे आघाडी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे काम करते. आघाडी ही सर्वसामान्यांची असल्याचेही ठाकरे सभेत बोलतांना म्हणाले.

सरकारकडून जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, पीएम स्वनिधी योजना, जलजीवन मिशन, पीएम किसान, मत्स्य योजना अशा योजना राबवल्या जात आहेत. यातील अनेक योजना कोंग्रेस काळातीलच आहे यांनी फक्त नाव बदलले असून या योजनांचा लाभ केवळ गुजरातलाच मिळत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर यातील काही योजनांना मोदींनी आपले नाव दिले आहे. हे सरकार मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान त्यांनी सांगितले की, मोदी सरकारचा एक रथ गावागावात फिरतोय. त्या रथाला गावकरी विरोध करत आहेत. या देशाचे नाव बदलून मोदी सरकार ठेवले जात आहे. या देशाचे नाव मोदी सरकार आहे की भारत सरकार? असा सवालही ठाकरेंनी केला. तसेच योजनांनाही मोदींचे नाव दिले जात आहे. या योजना काही मोदींच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत की सरकारच्या आहेत.

२०१४ साली मोदींनी चाय पे चर्चा हा कार्यक्रम केला होता. आता आपण गावागावात, पारावर बसून एक चर्चा करू. ती म्हणजे होऊन जाऊ द्या चर्चा हा कार्यक्रम आपण गावागावात सुरू करा आणि प्रत्येकाने सरकारच्या कामावर बोलायला सुरूवात करा.

१०० स्मार्ट सिटी बनवण्याचे मोदींनी सांगितले होते. मात्र आत्तापर्यंत किती शहरे स्मार्ट झाली आहेत, असेही ठाकरे म्हणाले. तुम्ही जर विनायक राऊत आणि वैभवला निवडून दिल नसत तर इथे देखील गॅंगवॉर झाले असत असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

धक्कादायक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात भाजप आमदाराने, शिवसेनाच्या माजी नगरसेवकला झाडल्या गोळ्या, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

मिंधे आणि फडणवीस गॅंग; सत्ताधाऱ्यांमध्ये आता गॅंगवॉर सुरु झाले

मालवणमध्ये बोलताना ठाकरेंनी आमदार गणपत गायकवाड यांच्या फायरिंग प्रकरणावरून शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका केली. सत्ताधारी पक्षात आता गॅंगवॉर सुरु झाले आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहेत. पोलीस आणि कायदाच जर हतबल झाला असेल तर असे गणपत गायकवाड उभे राहले तर दोष कोणी कोणाला द्यायचा असा सवाल देखील ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. तिकडे काय घडलं याच सीसीटीव्ही फुटेज देखील बाहेर आले असल्याचा सूतोवाच ठाकरेंनी केला.

शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत महाराष्ट्रात गुंडागर्दी होत राहील. गुंडांची पैदास होईल हे भाजपाच्या आमदाराच वक्तव्य आहे असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना अटक झाली आता केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत.

मग गणपत गायकवाड यांनी जे स्टेटमेंट केले आहे त्यांचे करोडो रुपये मिंध्यानकडे आहेत त्याची चौकशी होणार आहे की नाही. की चौकशी न करता त्यांना मोदी गॅरेंटी आहे म्हणत क्लीन चिट देणार हे आता समजेल असे देखील ठाकरे म्हणाले.

MahanayakOnline | Top News | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!