Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात भाजप आमदाराने, शिवसेनाच्या माजी नगरसेवकला झाडल्या गोळ्या, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Spread the love

भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर स्वत: बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना 2 फेब्रुवारीला रात्री उशिरा उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात घडली होती.

धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच हा सगळा भयंकर प्रकार घडला आहे. आता या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजच समोर आले असल्याने नेमकं काय घडले हे समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज; भाजप आमदाराकडून गोळीबार

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची जी दृश्य समोर आली आहेत त्यात असे दिसून येत आहे की, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात त्यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि शिवसेना नेते राहुल पाटील चर्चा करत बसले होते. बराच वेळ या लोकांमध्ये काही बोलणी सुरू होती.

पण अचानक आमदार गणपत गायकवाड हे आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी थेट महेश गायकवाड यांच्या दिशेने आपल्या बंदुकीतून 4 गोळ्या झाडल्या. यावेळी जीव वाचविण्यासाठी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांनी दालनातून बाहेर पळायला सुरुवात केली गणपत गायकवाड यांनी दोन गोळ्या राहुल पाटीलच्या दिशेनेही झाडल्या.

याचवेळी गोळी लागल्याने महेश गायकवाड हे दालनातच खाली कोसळले. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडच्या दिशेने जाऊन बंदुकीच्या मागच्या बाजूने डोक्यात जोरदार प्रहारही केला.

त्यानंतर हा सगळा गोंधळ पाहून पोलीस अधिकारी, गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड या दोघांचेही कार्यकर्ते हे दालनात शिरले. यावेळी त्यांच्यातही हाणामारी झाल्याचे दिसत आहे. आता ही सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

नेमका वाद काय?

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता. यामुळे काल (2 फेब्रुवारी) दोघांनीही आपल्या समर्थकांसह हिल लाईन पोलीस ठाणे गाठले.

यावेळी पोलीस ठाण्यात त्यांच्यात सुरुवातीला काही शाब्दिक वाद झाला. ज्यानंतर गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी अचानक महेश गायकवाडांवर (Mahesh Gaikwad) 4 गोळ्या झाडल्या. यावेळी शिवसेनेचे ( Shiv Sena ) राहुल पाटील यांनाही गोळी लागली. महेश गायकवाडांच्या पोटात आणि इतर ठिकाणी चार गोळ्या लागल्या आहे.

काय म्हणाले पोलीस ?

गोळीबाराच्या या घटनेबाबत डीसीपी सुधाकर पठारे यांनी सांगिले की, ‘महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी होऊन गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. यामध्ये 2 जण जखमी झाले असून अधिक तपास सुरू आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!