मराठा समाजाला माझा विरोध नाही, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे – छगन भुजबळ

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने नवीन अधिसूचना जारी केली केल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून संपूर्ण राज्यात ओबीसींच्या सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. याअंतर्गत आज अहमदनगरमध्ये ओबीसींची बैठक झाली.

Advertisements

छगन भुजबळ म्हणाले, २७ तारखेला गुलाल उडाला तर पुन्हा उपोषण कसे होणार? आरक्षण मिळाले आहे, असे सांगून हातात कागद घेतला आणि अध्यादेश येईल, असे सांगितले. अध्यादेश आणि अधिसूचनेचा मसुदा काय आहे हे लेकाला माहीत नाही. त्याला आता चार दिवस झाले असून राज्यात उन्माद सुरूच आहे. ओबीसी प्रवर्गातील लोकांवर घरासमोर शिविगाळ सुरु आहे, डिजे वाजवले जात आहेत.

Advertisements
Advertisements

राज्यातील विविध घटक काही ना काही मागण्यांसाठी धडपडत आहेत, मात्र त्यांना काहीच मिळत नाही. आणि उपोषण केले तर सरकारची धावपळ सुरू होईल, असे सांगितले. मी आताही म्हणतो मराठा समाजाला माझा विरोध नाही, त्यांना आरक्षण मिळालं पाहीजे असं म्हणणारे आम्ही आहोत. पण ते वेगळं द्या. आमच्या ताटातील देऊ नका असे छगन भुजबळ म्हणाले.

बोगस सर्वेक्षण सुरु?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीला गेले, मला त्यांचा अवमान करायचा नाही. ते मोर्चाला सामोरे गेले माझा विरोध नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ आपण पूर्ण केल्याचे त्यांनी जाहीर केले. मला प्रश्न असा पडला की शपथ पूर्ण झाली तर ओबीसी आयोग सर्वेक्षण कशासाठी करत आहेत. हे खोटं आहे का? बोगस सर्वेक्षण सुरु आहे. जात विचारली की  सर्व आपोआप भरलं जात, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

खोटे रेकॉर्ड तयार करण्यात येत आहेत.

क्युरेटिव्ह पिटीशनमध्ये जे घडले ते दुरुस्त करण्यासाठी तीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपेक्षाही जास्त पगार मिळतो. त्यांना आरक्षण मिळाले तर ते हे सर्व का करत आहेत? याची उत्तरे कशी शोधायची.

खोटे रेकॉर्ड तयार करण्यात येत आहेत. ए टू झेड सर्व कुणबी एक देखील दुसरा कोणी नाही. पुरावे निर्माण करण्यात येत आहे.  दरम्यान खोडाखोड करण्यात येत असल्याचा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे. हा खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी ३६० कोटी रुपये देण्यात आले. सगेसोयरे म्हणजे खोटे प्रमाणपत्र दिली जात आहेत. खोटी प्रमाणपत्र, खोटी वंशावळ जुळवण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

मराठा समाजाला दिले कुणबी दाखले

यावेळी छगन भुजबळ यांनी हायकोर्टाचा जजमेंट वाचून दाखवले. हायकोर्टाने म्हटले आहे, कुणबी हा धंधा होता. त्यांची जात मराठा होती. मराठा समाजाला कुणबी दाखले दिले तर सगळा मराठा कुणबी होईल आणि ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपवून टाकेल. त्याला काही अर्थ राहणार नाही. हे सर्व सरकारच्या लक्षात येत नाही का?, असा प्रश देखील या वेळी छगन भुजबळ यांनी उपस्तीत केला आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!