Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वन नेशन वन इलेक्शनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे.

वारंवार होणाऱ्या निवडणुकाअर्थव्यवस्थेसाठी चांगल्या नाहीत आणि विकासाला अडथळा आणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने प्रस्तावित केलेल्या सर्वात गंभीर सुधारणांपैकी एक म्हणजे एकाचवेळी निवडणुका घेणे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रात लिहिले आहे की, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ केंद्रीकृत आणि सुरळीत प्रशासन होईल यावर आमचा ठाम विश्वास आहे. जेव्हा देशाच्या काही भागात निवडणुका होतात तेव्हा प्रशासनावर लक्ष केंद्रित करणे फार कठीण होते; कारण या निवडणुका जिंकण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाते, असेही या पत्रात म्हटले आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या चार महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या असल्याचे ही त्यांनी नमूद केले आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!