Loksabha_Election_2024 : महाविकास आघाडीच्या पहिल्या फॉर्म्युल्याची चर्चा शिवसेना 23 जागांवर ठाम
लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 23 जागांवर दावा केला आहे. शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असून आपली ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोलाची जागा वंचितला देण्याची तयारी शिवसेनाने केली आहे.
महाविकास आघाडीचा लोकसभेचा पहिल्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी या 23 जागा लढण्यावर ठाम आहे. म्हणजेच, शिवसेना 23, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 15 आणि काँग्रेस 10 असा हा फॉर्म्युला आहे.
दुसरीकडे जागावाटपावरुन वाद होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांनीही 12-12-12-12 असा फॉर्मुला महाविकास आघाडीला दिला आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि वंचित या सर्वांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्या असे प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे आहे.
शिवसेनेने दावा केलेल्या 23 जागांवर विद्यमान खासदार कोण?
1) रामटेक – कृपाल तुमाणे (शिंदे गट)
2 ) बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिंदे गट)
3) यवतमाळ वाशिम – भावना गवळी (शिंदे गट)
4) हिंगोली – हेमंत पाटील (शिंदे गट)
5) परभणी – संजय जाधव (उद्धव ठाकरे गट)
6) जालना – रावसाहेब दानवे (भाजप)
7) छत्रपती संभाजीनगर – इम्तियाज जलील (एमआयएम)
8) नाशिक – हेमंत गोडसे (शिंदे गट)
9) पालघर – राजेंद्र गावित (शिंदे गट)
10) कल्याण – कल्याण श्रीकांत शिंदे (शिंदे गट)
11) ठाणे – राजन विचारे (उद्धव ठाकरे गट)
12) मुंबई उत्तर पश्चिम – गोपाळ शेट्टी (भाजप)
13) मुंबई दक्षिण – अरविंद सावंद (उद्धव ठाकरे गट)
14) मुंबई ईशान्य – मनोज कोटक (भाजप)
15) मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिंदे गट)
16) रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी, अजित पवार गट)
17) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत (उद्धव ठाकरे गट)
18) मावळ – श्रीरंग बारणे (शिंदे गट)
19) शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
20) धाराशिव – ओमराजे निंबाळकर (उद्धव ठाकरे गट)
21) कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे गट)
22) हातकणंगले – धैर्यशील माने (शिंदे गट)
23) अकोला – संजय धोत्रे (भाजप)
जागावाटपाच्या अंतिम चर्चेमध्ये काही जागांमध्ये बदल होऊ शकतो, मात्र या 23 जागांवर ठाकरे गट ठाम असल्याची वृत्त आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली होती, त्यामुळे सध्याची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून मागील दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगलसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला दिले नवे आदेश
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765