Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगलसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला दिले नवे आदेश

Spread the love

देशभरात बनावट कर्ज अॅप्सद्वारे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बनावट कर्ज अॅप्सच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारे अॅप्सचे जाळे भारतात पसरत असल्याने. या अॅप्सच्या माध्यमातून दररोज शेकडो लोकांची फसवणूक होत आहे. या माध्यमातून लोकांचा मानसिक छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने देशभरात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कडक आदेश दिले आहेत. आयटी मंत्रालयाने मंगळवारी सर्व कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही फसव्या कर्ज अॅप्सची जाहिरात न करण्याचे निर्देश दिले आहेत.

आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की फसवणूक झाल्यास संबंधित फसवणूक करणाऱ्या अॅपसह त्या अॅपची जाहिरात प्रसिद्ध करणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील जबाबदार असेल.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटा कंपनीच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगलसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला येत्या सात दिवसांत यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अशा जाहिराती काढून टाकण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांमध्ये सुधारणा करण्यावर काम करत आहे. यानंतर या कंपन्या कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाहीत.

दरम्यान, केंद्र सरकारने या जाहिरातींबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मध्यस्थ किंवा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कर्ज आणि सट्टेबाजी संबंधित कोणत्याही जाहिरातींना परवानगी देऊ नये.

या जाहिरातींद्वारे नागरिक, सोशल मीडिया वापरणाऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अशी प्रकरणे समोर आल्यास हे मध्यस्थ, जाहिरातदार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना जबाबदार धरले जाईल.

Congress Bharat Nyay Yatra: राहुल गांधी भारत न्याय यात्रेला निघणार, मणिपूरपासून सुरू होणार; काय आहे संपूर्ण प्लान


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!