Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Amit Shah on CAA : सीएएची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही – अमित शाह

Spread the love

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, कारण हा देशाचा कायदा आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (२६ डिसेंबर २०२३) सांगितले. दरम्यान, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील केला आहे.

भारतीय जनता पक्ष (BJP) राज्यातील 42 लोकसभेच्या 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या.

अमित शहा यांनी CAA बाबत आपली भूमिका स्पष्ट केली

पक्षाच्या कार्यक्रमात ते म्हणाले, पुढील विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला काम करायचे आहे. भाजप सरकार घुसखोरी, गाईची तस्करी आणि सीएएच्या माध्यमातून धार्मिक आधारावर छळणाऱ्यांना नागरिकत्व द्यावे लागेल. याची एक व्हिडिओ क्लिप भाजपच्या मीडिया विंगने शेअर केली आहे.

दरम्यान, अमित शाह यांनी सीएएच्या मुद्द्यावरून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, काहीवेळा, त्या देशात CAA लागू होईल की नाही या विषयी लोकांची, शरणार्थी याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

या विषयी मला स्पष्टपणे सांगायचे आहे की CAA हा देशाचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही. ही आमच्या पक्षाची बांधिलकी आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस CAA ला विरोध करत आहे, जे 2019 मध्ये संसदेने मंजूर केले होते.

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कायदा काय आहे?

या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या कायद्यामुळे धार्मिक छळामुळे देश सोडून पळून जावे लागलेल्या अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व मिळेल, असे भाजप सरकारने म्हटले आहे.

मात्र या कायद्यावर विरोधकांनी टीका केली आहे. हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहापासून वेगळे करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.

सध्या, भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने किमान 11 वर्षे भारतात राहणे आवश्यक आहे. या कायद्यामुळे ही अट आता सहा वर्षांसाठी शिथिल करण्यात आली आहे.

यासाठी पूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्यांना कायदेशीर सुविधा मिळू शकेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नाही आणि त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले जाऊ शकते किंवा प्रशासनाकडून ताब्यात घेतले जाऊ शकते.

नागरिकत्व कायदा, 1955 हा भारतीय नागरिकत्वाशी संबंधित एक सर्वसमावेशक कायदा आहे, जो भारतीय नागरिकत्व मिळविण्याच्या अटी निर्धारित करतो. या कायद्यात आतापर्यंत पाच वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत – 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015.

कोणतीही व्यक्ती आपले भारतीय नागरिकत्व तीन प्रकारे गमावू शकते –

  • जेव्हा एखादी व्यक्ती स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास तयार असते
  • जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारते
  • जेव्हा सरकार एखाद्याचे नागरिकत्व रद्द करते

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काय आहे वाद?

हा कायदा मुस्लीमविरोधी आहे आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतात. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक आधारावर कोणाला नागरिकत्व कसे मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे.

या कायद्याला ईशान्य भारतात, विशेषत: आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये तीव्र विरोध केला जात आहे, कारण ही राज्ये बांगलादेशच्या सीमेवर आहेत.

बांगलादेशातून हिंदू आणि मुस्लिम मोठ्या संख्येने या राज्यांमध्ये आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीर आश्रय मिळणे सोपे करून भाजप सरकार आपला मताधिक्य मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NCR) मधून बाहेर पडलेल्या हिंदूंना भारतीय नागरिक म्हणून ओळखणे सरकारला सोपे जाईल, असाही आरोप आहे.

Congress News Update : नागपूरमध्ये 28 रोजी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ, ‘है तयार हम चा’ चा नारा….


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!