Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MharshtraNewsUpdate : पेशवे आणि औरंगजेबाबत भालचंद्र नेमाडे नेमकं काय म्हणाले ?

Spread the love

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नानासाहेब पेशवे यांच्याविषयी एक विधान केले आहे. नानासाहेब पेशवे जाईल तिकडे ८ ते १० वर्षांच्या मुलीची मागणी करत होते. या मुली त्यांना कशासाठी लागायच्या हे मी सांगत नाही, असे ते म्हणालेत. नेमाडे यांनी 2 दिवसांपूर्वी मुघल बादशहा औरंगजेबाने देशातील सतीप्रथा बंद केल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आता त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना पेशव्यांच्या चालीरितींवर बोट ठेवले आहे.

मी स्वतः पत्रे वाचली…

भालचंद्र नेमाडे म्हणाले की, पंजाबच्या गोविंदपंत बुंधेले यांना नानासाहेब पेशवे यांचे पत्र यायचे. त्यात ते त्यांना 8 ते 10 वर्षांच्या 2 शुद्ध व सुंदर मुलींची तयार ठेवण्याचे निर्देश देत होते. 40 ते 42 वर्षांचे नानासाहेब पेशवे या मुलींना मारून टाकायचे की काय हे मला माहिती नाही. या मुली त्यांना का लागायच्या हे मी सांगणार नाही. पण पेशवे खूप वाईट होते. आपण त्यांच्या तावडीतून सुटले हे खूप चांगले झाले. गोविंदपंत बुंधेले यांना मिळालेली पत्रं मी वाचलेली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी या प्रकरणी जोडली.

दुसरे बाजीराव पेशवे थोर व्यक्ती

भालचंद्र नेमाडे पुढे म्हणाले की, आपल्याला माहिती असणारा इतिहास खरा नाही. दुसरे बाजीराव पेशवे खूप मोठे व्यक्ती होते. त्यांनी महाराष्ट्राला वाचवून इंग्रजांच्या स्वाधीन केले. पेशवे म्हणजे दुष्ट व निच वृत्तीचे लोक होते. खरा इतिहास वाचण्यासाठी आपल्याला पुस्तके वाचावी लागतील.

इंग्रज पेशव्यांहून कमी बदमाश होते

मी बालपणापासून जे काही वाचले, आईकडून महानुभाव, लीळाचरित्र ऐकून मोठा झालो. तुकारामांना वाचून आम्ही मोठे झालो. तुकाराम व श्री चक्रधर यांच्याशिवाय कोण मोठे आहे जगात. जे खरं आहे ते पाहायचं. त्यामुळे खरी माहिती आम्ही काढली. हे सगळे लोक बदमाश होते. त्यामुळेच इंग्रज आले. त्यांच्याकडे जहाजे होती. दारुगोळा होता. म्हणून ते येथे आली नाही. येथील लोकांना धडा शिकवण्यासाठी ते येथे आले. ते ही लोक बदमाश होतेच. पण येथील लोकांहून कमी होते, असेही नेमाडे यावेळी म्हणाले.

औरंगजेबाने ज्ञानवापीची मोडतोड का केली?

भालचंद्र नेमाडे औरंगजेबाविषयी बोलताना म्हणाले होते की, औरंगजेबाविषयी चुकीची माहिती सांगितली जाते. ते तसे नव्हते. त्यांनी सर्वप्रथम भारतातील सती प्रथा बंद करण्याचे काम केले. काशी-विश्वेश्वर येथील पंडितांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या. औरंगजेबाच्या 2 राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. त्या परत आल्या नाहीत. चौकशी केल्यानंतर समजले की, तेथील पंडित तरुण बायकांना भूयारी मार्गतून नेऊन भ्रष्ट करायचे.औरंगजेबाला हे समजले तेव्हा त्याने ज्ञानवापीची मोडतोड केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!