Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चंद्रशेखर आजादवरील हल्लाप्रकरणी भीम आर्मी व मुस्लीम समाजाची धारावीत निदर्शने आजाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

Spread the love

भीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटनेचे संस्थापक अॅड चंद्रशेखर आजाद यांच्यावर परवा उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्याचे पडसाद आजदेखील मुंबईसह राज्यभरात उमटले. मुंबईतील धारावी सायन येथे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करीत आजाद यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली.
आजाद यांच्या गाडीवर सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला यात आजाद गोळी लागून जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.

चंद्रशेखर आझाद, रावण यांच्यावर प्राणघातक हल्ला… हल्लेखोर पसार

मुबईतील धारावी येथे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष जाहीद अली शेख यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात जोरदार निदर्शने केली. या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र महासचिव सुनील थोरात, मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड, उपाध्यक्ष अविनाश समिंदर, भास्कर गायकवाड, नौशाद सिद्दीकी, आफताब शेख, लतिफ शेख, जावेद अली शेख, मजिद शेख,मोहसिन शेख, कपिल सलमानी, यांच्यासह शेकडो महीला व पुरूष कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

आजाद यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना त्वरीत अटक करून कडक कारवाई करावी ,सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच आजाद यांना त्वरीत झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी यावेळी पोलीसांमार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मागण्या पुर्ण होईपर्यत हे आंदोलन देशासह राज्यभरात चालविण्यात येणार असल्याचे यावेळी अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितले तर खरे गुन्हेगार व त्यांच्या मास्टरमाईंडला अटक न झाल्यास सर्व सामाजिक राजकीय पक्ष संघटनांना घेऊन मुंबईत आणखी तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांनी दिला आहे.

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

Click to listen highlighted text!