Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


Saturday | 01.July.2023


 

 • उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्यात आझाद गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोरांची कार जप्त केली होती. अखेर, चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार हल्लेखोरांना पोलिसांनी अंबाला येथून अटक केली आहे. यातील तीन हल्लेखोर रणखंडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 • प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे पोलीस युवतीने संपविले आपले जीवन
  गडचिरोली: अरमोरी शहरापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी घेतल्याची घटना ३० जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली, शारदा नामदेव खोब्रागडे (३० वर्ष) असे सदर शिपायाचे नाव आहे.

 • बसला आग लागल्यामुळे सर्व मृत प्रवाशी मोठ्याप्रमाणावर आगीत होरपळले होते. त्यामुळे त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा आणि मृतांच्या नातेवाईकांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमच्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यासाठी पाच दिवस लागतील. एवढा काळ न थांबता रविवारी सकाळीच सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली

 

 

 • संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. २० जुलैपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे, हे सत्र नुकतेच उद्घाटन झालेल्यान नवीन संसद भवनात होणारे हे पहिलेच अधिवेशन ठरणार आहे.

 

 

 • हरोली (ता. शिरोळ) येथील १०८ पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिरात रविवारी (दि.२) चातुर्मास स्थापना होणार आहे. तसेच सोमवारी (दि.३) गुरूपौर्णिमेनिमित्त दुपारी २ वाजता गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे. हरोली येथे २९ जूनरोजी श्री १००८ आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांचे परमप्रभावक शिष्य निर्यापक श्रमण श्री १०८ नियमसागर महाराज यांचे ससंघ आगमन झाले होते. गेले २ महिने नियमसागर महाराज आणि संघ यांचा चातुर्मास कुठे होणार याची उत्सुकता संपूर्ण दिगंबर जैन समाजात होती. अखेरीस हरोली येथे चातुर्मास होणार असल्याचे ठरले.

 

 • अमरनाथ गुफेत विधिवत पूजा करण्यात येणार आहे. तर आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे.

  जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंच्या पहिल्या तुकडीला आज सकाळी जम्मूतील भगवती नगर कॅम्प परिसरातून हिरवा झेंडा दाखविला. कडक सुरक्षाव्यवस्थेत सुमारे ३,४००हून अधिक भाविकांची ही तुकडी काश्मीरातील बेस कॅंपच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर ती दक्षिण काश्मीरमधील हिमालयातील समुद्रसपाटीपासून ३,८८० मीटर उंचीवरील अमरनाथ गुंफेचा पुढील प्रवास करेल.

 • बुलढाणा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर

 

 • शिरवळ येथे ट्रॅव्हल्सचा अपघात 1 जण ठार, 4 जण जखमी.

 

 • परतीच्या प्रवासात वारकऱ्यांचे प्रचंड हाल; रेल्वेतील भयानक गर्दीमुळे श्वास घेता येईना

 

 • भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. यापूर्वी नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर फेकून पहिला क्रमांक पटकावला होता.

 

 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

मिळालेल्या माहितीनुसार,४ ते ६ जुलै दरम्यानच्या दौऱ्यात त्या विदर्भातील कोराडी, वर्धा आणि सेवाग्राम या ठिकाणांना भेटी देणार आहेत. 4 जुलैला त्या नागपूरातील राजभवानात दाखल होतील. त्यानंतर कोराडी येथील रामायण कल्चरल सेंटरचं 5 जुलैला राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. त्या नंतर राष्ट्रपती हेलिकॉप्टरने वर्ध्याला जातील. ६ जुलै रोजी त्या सेवाग्रामला भेट देतील. या दोन दिवसांच्या त्यांच्या विदर्भ दौऱ्यात त्यांचा मुक्काम नागपूरच्या राजभवनात असेल. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे प्रशासनेही त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरु केली आहे.

५ जुलैला सकाळी त्या हेलिकॉप्टरने गडचिरोलीला रवाना होतील. गडचिरोलीत सकाळी साडेदहाच्या दिक्षांत समारंभ पार पडल्यानंतर त्या पुन्हा नागपुरात येतील. त्यानंतर नागपूरातील सायंकाळी कोराडी येथील भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल.  दुसऱ्या दिवशी ६ जुलै २०२३ रोजी सकाळी हेलिकॉप्टरने वर्ध्याला जातील. साडेअकराच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईला जातील. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, आणि ७ जुलैला शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्या सायंकाळी दिल्लीकडे रवाना होतील.

 

 • राजधानी पॅरिससह इतर अनेक शहरांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ सुरूच आहे. फ्रेंच सरकारने हिंसाचार रोखण्यासाठी अनेक नवीन पावले उचलण्याची घोषणा केली आहे. फ्रान्समध्ये तीन दिवसांच्या हिंसाचारात 492 इमारती आणि 2,000 वाहनांना आग लावण्यात आली. आतापर्यंत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले असून ते दुकाने, घरे, कार्यालये आणि वाहने पेटवत आहेत. आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटही झाली. अशात हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात सहभागी 249 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. निदर्शने नियंत्रित करण्यासाठी सुमारे 40,000 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

 

 

 • केनियाच्या पश्चिमेकडील लोंडियानी येथे शुक्रवारी संध्याकाळी एक शिपिंग कंटेनर वाहून नेणारी लॉरी रस्त्यावरून पलटी होऊन अनेक वाहनांवर आदळल्याने झालेल्या अपघातात किमान 48 जणांचा मृत्यू झाला.

 


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!