Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BusAccident : धक्कादायक; समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात २५ जण जागीच ठार

Spread the love

नागपूरवरुन पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला असून अपघातानंतर बसला आग लागली. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा, समृद्धी महामार्गावर झाला आहे. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते व बसमधील आठ प्रवासी जखमी असून २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींनीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त बस ही विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याचे वृत्त आहे. ही बस नागपूर येथून पुण्याकडे निघाली होती. ही बस पहिल्यांदा खांबाला धडकली त्यानंतर पलटी झाली आणि आग लागली. बस डाव्या बाजूला कोसळली त्यामुळे दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता त्यामुळे बाहेर पडण अशक्य झाले.

चालकाने सांगितल्यानुसार हा अपघात टायर फुटल्याने बसमध्ये आग लागली. नंतर गाडीच्या डिझेल टाकीला आग लागली. बस अपघातग्रस्त झाल्यानंतर बसमधील काही तरुणांनी काचा फोडल्या आणि ते बाहेर आले, त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. हा अपघात सुमारे मध्यरात्री १.२६ मिनिटांनी झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ मधील प्रवासी होते.

दरम्यान बुलढाणा एसपी सुनील कडासणे म्हणाले की, नागपूरहून पुण्याकडे जात असताना पहाटे दीडच्या सुमारास बसला अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ३ मुले असून उर्वरित प्रौढ आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

GSTNewsUpdate : जीएसटीमध्ये मोठी कपात, मोबाईल फोन आणि टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू होणार स्वस्त…


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!