Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BusAccidentNewsUpdate : या फोनवर चौकशी करा , मध्यरात्रीचा थरार , कुणी वाचवायलाही नव्हते , मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत जाहीर …

Spread the love

या क्रमांकावर संपर्क साधा

बुलडाणा  : समृध्दी महामार्गावर आज झालेल्या अपघातासंदर्भात खासगी बस मधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबर वर संपर्क साधावा.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री

या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये बसने पेट घेतल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार आहे, असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मृतांची ओळख पटवणे झाले अवघड

सांगण्यात येत आहे की , समृद्धी महामार्गावर हा अपघात झाल्यानंतरसुमारे अर्धा ते पाऊण तास कोणतीच मदत मिळू शकली नाही. बसचा एक चालक कसा तरी काच फोडून बाहेर पडल्यावर त्याने फोन करून माहिती देईपर्यंत व मदत घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठी जीवितहानी घडून गेली. दरम्यान पिंपळखुटा गावातील दोन जण पहाटे मोठा आवाज आल्याने समृद्धी महामार्गावर धावून गेले होते.परंतु आग लागल्यानंतर लगेच ती भडकल्याने ते दोघेही हतबल झाले होते. त्यामुळे त्यांना मदत करता आली नाही. त्या दोघांनीच नंतर सिंदखेड राजा पोलिसांना अपघाताची माहिती दिली होती.

बसची वरची खिडकी तोडली आणि बाहेर पडलो

नागपूरहून औरंगाबादकडे निघालेला काही प्रवाशांनी घडलेल्या या अपघाताचा थरार सांगितला. आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासानं बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर ही बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर लगेच बसने पेट घेतल्याची माहिती बसमधील प्रवाशांनी दिली. आम्ही 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले.

अपघाताचे वृत्त समजताच पहाटे पाच वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने हे घटनास्थळी दाखल झाले . पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारीही तत्काळ घटनास्थळी आले. बसमधील प्रवाशांचा अक्षरशः जळून कोळसा झाल्याने मृतांची अेाळख पटवणे अवघड झाले आहेत. यासंदर्भात डीएनए टेस्टच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.नागपूर येथून या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची यादी मागविण्यात आली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

बसचा चालक व क्लिनर बचावले

विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यात प्राथमिक अंदाजानुसार २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही बस वातानुकुलीत असल्याने अपघातानंतर बसचा दरवाजा लॉक झाला होता. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे. बसचा चालक व क्लिनर अपघातानंतर बसचा काच फुटल्याने कसेबसे बाहेर पडू शकले होते. त्यांनीच १०८ रुग्णवाहिकेस फोन केल्यानंतर अपघाताची माहिती मिळाली असल्याची बाब समोर आली आहे.

सांगण्यात येते की , ही बस काही काळ कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेजवरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यु झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!