Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मातोश्रीत निघाला विषारी साप !!

Spread the love

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी कोब्रा या जातीचा नाग आढळला आहे. मातोश्री बंगल्यावरच्या कर्मचाऱ्यांना हा नाग दिसला. त्यामुळे त्यांनी सर्पमित्रांना बोलावलं आणि वन्यजीव संरक्षण तसंच रेस्क्यू टीमलाही पाचारण केलं. सर्प मित्रांनी शिताफीने या नागाला पकडलं आणि जंगलात सोडलं. मातोश्री बंगल्यातल्या पाण्याच्या टाकीमागे हा नाग लपला होता.

रेस्क्यू टीमला ही माहिती जेव्हा मिळाली तेव्हा ते तिथे पोहचले. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने या नागाला पकडले आणि जंगलात सोडले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान तेजस ठाकरेही तिथे उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. हा नाग पकडला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्पमित्रांचे आभार मानले आहेत. मातोश्री बंगल्यात नाग शिरल्याची बातमी उद्धव ठाकरेंना कळली तेव्हा ते तातडीने बाहेर आले. त्यांनी या नागाला जे रेस्क्यू करण्याची प्रक्रिया होती ती पाहिली. किंग कोब्रा या जातीचा हा नाग आहे. जवळपास चार फुटांचा हा नाग होता. हा विषारी जातीचा साप आहे.

संजय राऊत यांच्या  निवासस्थानीही शिरला होता साप

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरातही साप शिरल्याची बातमी समोर आली होती. खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेत होते. त्यावेळी हा साप तिथे निघाला. संजय राऊत यांच्या खुर्चीजवळच हा साप दिसला होता. पांदीवड नावाचा बिनविषारी जातीचा तो साप होता. त्यावेळीही सर्पमित्रांना बोलवून हा साप पकडण्यात आला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी किंग कोब्रा आल्याचं वृत्त समोर आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!