AurangabadNewsUpdate : संभाजीनगर शहरात दोन गटात राडा , पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात , सर्व काही सुरळीत …
छत्रपती संभाजी नगर : शहरात श्रीराम नवमीची तयारी सुरु असताना मध्यरात्रीच्या सुमारास शहरच्या किराडपुरा भागातील राम मंदिरासमोर दोन गटात घोषणा युद्धाचे रूपांतर हिंसाचारात झाले. त्यात समाजकंटकांनी पोलिसांच्या १३ वाहनांना आगीच्या हवाली केले. दरम्यान पोलिसांनी वेळीच कारवाई करीत जमावाला पांगवले आणि परिसरात शांतता निर्माण केली. दरम्यान घटना स्थळावरील राम मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस आययुक्त निखिल गुप्ता यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांना बाली न पडण्याचे वाहन केले आहे.
या विषययीची अधिक माहिती अशी की, जुन्या औरंगाबाद शहरच्या पूर्वेला रोशन गेट ते सिडको कडे जाणाऱ्या मौलाना आझाद चौक या रस्त्यावर राम मंदिर आहे. या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास श्रीराम जयंतीची तयारी चालू होती. यावेळी “जय श्रीराम ” च्या घोषणा देण्यात येत होत्या. राम मंदिराबाहेरील रस्त्यावर जेंव्हा एक गट घोषणा देऊ लागला तेंव्हा रस्त्याच्या समोरील भागात उभ्या असणाऱ्या गटानेही घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणा वाढत असताना एका गटातील तरुण जेंव्हा आपल्या वाहनातून जाऊ लागले तेंव्हा त्यांच्या वाहनाचा धक्का दुसऱ्या गटाच्या तरुणाला धक्का लागला आणि दोन्हहीही गटात शाब्दिक चकमक उडाली त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आणि तरुणांची मोठी गर्दी झाली. दरम्यान या गर्दीतील समाजकंटकानी रस्त्यावर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली. त्यानंतर त्यानंतर रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला.
राम मंदिराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही….
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. खा. इम्तियाज जलील, सहकार मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जयस्वाल, केंद्रीय मंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे , जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: मंदिरात कोणतीही हानी नाही असे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्तांचे आवाहन
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की , “रात्री जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आता परिस्थिती शांत आहे. संबंधित गुन्हेगारांवर पोलीस कडक कारवाई करतील. संभाजीनगरमध्ये लोक एकोप्याने राहतात, अशीच शांतता ठेवण्यात आणि चांगले वातावरण ठेवण्यात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. कालच्या घटनेप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे लोक यात सहभागी होते त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
इम्तियाज जलील यांचं नागरिकांना आवाहन
ज्या राम मंदिराबाहेर हा राडा झाला त्या मंदिरात सभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील काल मध्य रात्रीच तेथे गेले आणि मंदिरात बासूनच त्यांनी एक व्हिडीओ जारी कारून त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी सध्या राम मंदिरात आहे. या मंदिरात कोणतीही गडबड झालेली नाही. मात्र मंदिराबाहेर थोडा गोंधळ आहे. जर कोणी चुकीच्या अफवा पसरवत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. मंदिराबाहेर काही वाहनांचं नुकसान केलं आहे. परंतु मंदिरात कोणतंही चुकीचं काम करण्यात आलेलं नाही. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.