Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तृतीयपंथी पोलीस भरतीसाठी मराठवाड्यातील पहिला अर्ज दाखल

Spread the love

राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज शेवटच्या दिवशी, देश सेवेची आवड असलेल्या, नांदेड शहरातील उच्च शिक्षित आणि सध्या MPSC ची तयारी करणाऱ्या दिनेश हणवते या तृतीयपंथीयाचा पोलीस भरती नोकरीचा मराठवाड्यातील पहिला अर्ज दाखल झाला आहे.


राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळताच दिनेशने, आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. मात्र तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र नसल्याने फॉर्म भरण्यास अडचण येत होती. दरम्यान समाजाशी लढत निर्माण झालेली जिद्द आणि तृतीयपंथीयासाठी काम करणार्‍या कमल फाउंडेशनने मदत करून हे काम सोप्प केले. आणि तीला पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिली आहे. काल अखेर शेवटच्या दिवशी सायंकाळी तीचा पोलीस भरतीसाठीचा फॉर्म भरून घेतला असून ती पोलीस भरती प्रक्रियेतील मराठवाड्यातील पहिली तृतीयपंथी उमेदवार ठरलीय. दरम्यान आम्ही घेतलेल्या माहीती नुसार काल शेवटच्या दिवशी राज्यातील तृतीयपंथी उमेदवाराचा हा पहिलाच अर्ज दाखल करण्यात आला आहे.

 

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!