दोन लाख स्वस्त धान्य दुकानदारांना रस्त्यावर आणण्याचा भाजपचा प्रयत्न?
स्वस्त धान्य दुकानदारांचा आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास गमावून बसलात तर देशात भाजपचे सरकार राहणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी बुलढाण्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मेळाव्यात भाजपला दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, रेशन बचाव समिती महाराष्ट्र आणि जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधरक संघटना यांच्या वतीने शेतकरी लाभार्थ्यांना सोबत घेऊन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधु प्रल्हाद मोदी यांनी लाभार्त्यांचे स्वस्त धान्य बंद केल्याने भाजपवर टीका केली आहे. दरम्यान, प्रल्हाद मोदी म्हणाले, “भाजप म्हणतो की सबका साथ सबका विकास. परंतु, हे स्लोगन तुम्ही खोटे ठरवत आहात. दोन लाख स्वस्त धान्य दुकानदारांना रस्त्यावर आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. असे झाले तर कुठून विश्वास राहील. भारत सरकारने विचार केला पाहिजे की २०२४ येत आहे. जर माझ्या पाच लाख दुकानदारांचा आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास गमावून बसलात तर हे समजू नका की देशात भाजपचे सरकार राहील. स्वस्त धान्य दुकानदार ही लोकशाहीची किल्ली आहे. आम्हाला दुसरे काही करायचे नाही, फक्त ज्यावेळी महिला राशन घ्यायला येतील त्यावेळी त्यांना सांगायचे की यांच्यावर विश्वास ठेवू नका. सरकारला आमचा इशारा आहे की, तुमचे धोरण बदला अन्यथा राशन दुकानदार हे काळे नाग आहेत. जर धोरण बदलले नाही तर आम्ही तुम्हाला बदलू, असा इशारा प्रल्हाद मोदी यांनी दिलाय.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील ३९ लाख ९७००० लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा कायद्यातील तरतूदीप्रमाणे सवलतीच्या दरात धान्य देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेत बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ७२००० लाभार्त्यांचा समावेश आहे. मात्र, १ जुलै २०२२ पासून या योजनेतील लाभार्थ्यांचे गव्हाचे वाटप बंद करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या लाभार्थ्यांचे तांदूळाचे वाटप बंद करण्यात आले. तसेच, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोणत्याच प्रकारचे धान्य या लाभार्थ्यांना देण्यात आले नाही. सरकारच्या या धोरणाविरोधात लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. लाभार्थी धान्य मिळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांसोबत वाद-विवाद करू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा संघटनेकडून आणि राज्य संघटनेकडून या लाभार्थ्यांना धान्य मिळण्याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, या निवेदनांची कोणीही दखल घेण्यात अली नाही. त्यामुळेच रेशन बचाव समिती महाराष्ट्र आणि जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधरक संघटना यांच्या वतीने बुलढाण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
काही लोकांनी देशाचे तुकडे करण्याचा विडा उचलला आहे – उदयनराजे
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055