News Update | जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आव्हाड यांच्या वकिलांकडून जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या वतीने ऍड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला. ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही कदम यांनी केला आहे.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. ऍड प्रशांत कदम यांनी आव्हाडांच्या अटकेवर युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ऍड कदम यांनी केला आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून कलम ७ हा वाढवू शकत नाही, कारण तशी तरतूद १९३२ साली करण्यात आली आहे जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील मी स्वतःहून चौकशी करता आलो होतो असे सांगत तपासाला मी पूर्ण सहकार्य केले असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले आहे. ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही कदम यांनी केला. दरम्यान,सरकारी वकील म्हणून ऍड अनिल नंदीगिरी कोर्टात पोलिसांची बाजू मांडली.
ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये चालू असलेला (Har Har Mahadev) ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात आ. जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर काल आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली.
JitendraAvhadNewsUpdate : ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध , आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक