Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Update | आणखी एक मोठा प्रकल्प राज्याच्या हातातून गेला

Spread the love

शिंदे-फडणवीस सरकारवर, टाटा एअर बस (Tata Air Bus), वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने टीका होत असतानाच आणखी एक प्रकल्प राज्याच्या हातातून गेला. महाराष्ट्र, केंद्र सरकारकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात अपयशी झाले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ४०० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हा प्रकल्प मिळण्यासाठी आठ राज्यांमध्ये स्पर्धा होती. या स्पर्धेत मध्य प्रदेश एमआयडीसीने बाजी मारली असून हा प्रकल्प त्यांना मिळाला आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश,ओडिसा आणि तामिळनाडू या आठ राज्यांमध्ये स्पर्धा होते. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र एमआयडीसी ने केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे मूल्यांकन प्रकल्प व्यवस्थापन एजन्सी (PMA) द्वारे विभागाने तयार केलेल्या कार्यपद्धतीवर आधारित होते. मात्र मूल्यमापनामध्ये मध्यप्रदेश एमआयडीसीने सर्वाधिक गुण मिळवल्याने पीएमएच्या निदर्शनास आले. त्यानुसार हा प्रकल्प मध्य प्रदेशला देण्याची शिफारस करण्यात आली.

१३ एप्रिल २०२२ रोजी याबाबत प्रस्ताव पाठवण्याची अधिसूचना निघाली होती तर एमआयडीसीच्या मार्फत प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख ८ जून २०२२ ही होती. केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशानात या प्रकल्पाची घोषणा केली होती. साधारणत: पाच वर्षांसाठी ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये होणार होती. या प्रकल्पासाठी सर्वच राज्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

“मध्य प्रदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मध्य प्रदेश आता आत्मनिर्भर एमपीचे स्वप्न साकार करण्यासाठी जोमाने वाटचाल करत आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी भरभरुन योगदान देत आहेत,” अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरील ट्वीट म्हटले आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प देखील महाराष्ट्राने गमावला आहे.

कोणकोणते प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटले?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प देखील महाराष्ट्राला मिळवता आला नाही. महाराष्ट्रात 394 फार्मसी कॉलेज आहेत. मात्र बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प चार अन्य राज्यांना देण्यात आला. मेडिकल डिव्हाईस पार्क हा प्रकल्प देखील राज्यातून गेला. हा प्रकल्प औरंगाबादेत होणार होता. तर टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. नागपूरमध्ये हा प्रकल्प होणार होता. परंतु आता तो गुजरातमध्ये होणार आहे. आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प राज्याच्या हातातून गेला आहे.

 

 

 

 

 

Maharashtra Update | Maharashtra Update

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!