Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JitendraAvhadNewsUpdate : ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध , आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक

Spread the love

ठाणे : ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये चालू असलेला ‘हर हर महादेव’  या चित्रपटाचा शो बंद पाडल्याच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून  मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात आ. जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.


आ. आव्हाड यांना अटक झाल्याचे समजताच ठाणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याला दुपारी ३ वाजल्यापासून घेराव घालत आंदोलन केले. ‘आव्हाड साहब आगे बडो, हम तुम्हारे साथ है, जितेंद्र आव्हाड अंगार है, बाकी सब भंगार है, सरकार डरती, पोलीस को आगे करती है… ‘, अशी जोरदार घोषणाबाजी करीत अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून हि माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की ,  “आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटले  कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.”

आव्हाड यांनी आपल्या पुढील ट्विटमध्ये म्हतळे आहे की , “मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.”

दरम्यान त्यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की , “हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेले  नाही, तो मी गुन्हा कबूल करणार नाही.”

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

दरम्यान आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की ,  महाराष्ट्रातील पोलीस अतिशय कर्तव्यदक्ष असून देशात आदर्श निर्माण करणारी पोलीस आहे. या पोलिसांना वरुन दबाव आल्याचे दबक्या आवाजात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मात्र, ज्या कारणासाठी जितेंद्र आव्हाड यांना पोलीस ठाण्यात बोलावले  आणि त्यांना अटक करण्यात येत आहे, त्यासाठी मी त्यांच्या अटकेचे  स्वागत करते. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देवाप्रमाणे आहेत, जर शिवाजी महाराजांबद्दल कोणी चुकीचे  सांगत असेल आणि त्याविरुद्ध जितेंद्र आवाज उठवत असतील, त्यामुळेच हे सरकार आव्हाड यांना तुरुंगात टाकत असेल तर आम्ही सगळेच तुरुंगात जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करू, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिला आहे. महाराष्ट्राची आन, बाण, शान आणि आमचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांबद्दल जे चुकीचे  दाखवण्यात येत आहे, त्याचे  जर हे सरकार समर्थन करत असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे.

 

 

JitendraAvhadNewsUpdate | JitendraAvhadNewsUpdate | JitendraAvhadNewsUpdate

ElectionNewsUpdate : धक्कादायक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकी आधीच रोख रक्कम, दारू आणि मोफत भेटवस्तू जप्त…

ElectionNewsUpdate : धक्कादायक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकी आधीच रोख रक्कम, दारू आणि मोफत भेटवस्तू जप्त…

 


create your own website

#Trasport Mini Truck Dealers & Service : 9762041481 

Maharashtra Update
Live Update
trasport aurangabad

आपलं सरकार

Click to listen highlighted text!