मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आता 50 हजार नव्हे, 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ, 56 लाख शेतकऱ्यांना फायदा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांनाही आता 50 हजार रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच नियमित कर्जफेडीची अटही शिथिल करण्यात येणार असून, मागील कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार आहे.
विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सलग तीन वेळा कृषी कर्जमाफी देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी शेतकरी सावकारांच्या विळख्यात अडकू नयेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने पाळला आहे. ही योजना केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता (OTS) आणि प्रोत्साहन योजना अशा तीन प्रमुख बाबींचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार दरवर्षी वीजबिल सवलतीसाठी सुमारे 25 हजार कोटी रुपये, तर कृषी विभागाच्या विविध योजना आणि अनुदानांसाठी 95 हजार कोटी रुपयांची तरतूद करत आहे. बँकांशी चर्चा करून ही योजना तयार करण्यात आली असून, सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे.
याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत, या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एएआयबीकडून सुरू असल्याचे सांगितले. “सत्य बाहेर आल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
वीजबिल वाढीवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; स्मार्ट मीटर निर्दोष असल्याचा दावा
शेतकरी कर्जमाफी, 2 लाख कर्जमाफी, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, Devendra Fadnavis, Maharashtra Loan Waiver, Farmer Loan Waiver Maharashtra, 56 लाख शेतकरी, कृषी कर्जमाफी, शेतकरी योजना, महाराष्ट्र कृषी बातम्या
