Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छ.संभाजीनगरात खळबळ! ‘डॉन’च्या बंगल्यावर गुन्हे शाखेची धाड; साडेपाच कोटींची रोकड जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी पहाटे गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ९०च्या दशकात शहरात आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका कथित ‘डॉन’च्या पडेगाव येथील आलिशान बंगल्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकत मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Advertisements

प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत ५ कोटी रुपयांची रोकड, २१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांची चांदी, ४ रायफल्स, सुमारे ५०० जिवंत काडतुसे, तलवारी आणि चाकू जप्त करण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

पहाटेपासून पडेगाव परिसराला पोलिसांचा वेढा

गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास पडेगाव येथील बंगल्याला चारही बाजूंनी घेराव घालत झडती सुरू केली. ही कारवाई पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली नोटा मोजण्याची यंत्रे

झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याने ती मोजण्यासाठी पोलिसांना नोटा मोजण्याची यंत्रे मागवावी लागली. रोकडीसह बंगल्यातून सोने-चांदीचे दागिने, शस्त्रे आणि महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची चौकशी सुरू

सध्या पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचे आर्थिक व्यवहार, बँक खाती, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि संभाव्य बेनामी व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

धाडीमागील कारण अद्याप स्पष्ट नाही

९०च्या दशकातील या कथित ‘डॉन’वर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई का करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आर्थिक गैरव्यवहार, खंडणी, जमीन बळकावणे किंवा इतर गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचा हा भाग असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकृत माहिती जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

‘माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ले करा’; ट्रम्प यांचा थेट इशारा

Sambhajinagar Crime News, Chhatrapati Sambhajinagar Raid, Crime Branch Raid, Sambhajinagar Breaking News, Maharashtra Crime News, Don Bungalow Raid, Cash Seizure News, Illegal Weapons Seized, Aurangabad Crime News, Marathi Breaking News

आपलं सरकार

Click to listen highlighted text!