Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘माझी हत्या झाली तर इराणवर बॉम्बहल्ले करा’; ट्रम्प यांचा थेट इशारा

Advertisements
Advertisements
Spread the love

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोठे वक्तव्य केले आहे. “जर इराणने माझी हत्या करण्यात यश मिळवले, तर त्या देशावर यापूर्वी कधीही न झालेल्या पातळीवर बॉम्बहल्ले करण्याच्या सूचना मी आधीच दिल्या आहेत,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

Advertisements

‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून इराणच्या लक्ष्यावर असून संभाव्य धोक्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

Advertisements
Advertisements

“मी इराणच्या लक्ष्यावर अनेक वर्षांपासून”

ट्रम्प म्हणाले, “मी इराणच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बराच काळ आहे. माझ्याबाबत काही घडले तर इराणवर अशा स्तरावर बॉम्बहल्ले करा, जे त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसतील.”

इस्रायलने त्यांच्या हत्येच्या कथित इराणी कटाबाबत माहिती दिल्याच्या वृत्तांवर बोलताना त्यांनी सध्या कोणतीही नवीन माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

इराणला अण्वस्त्रे मिळू देणार नाही

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला अण्वस्त्रे मिळू देणार नसल्याची भूमिका मांडली. भविष्यात दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढला तरी तो दीर्घकाळ चालणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

सोलेमानी हल्ल्यानंतर वाढला तणाव

२०२० मध्ये ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणकडून ट्रम्प यांच्याविरोधात सूड उगवण्याची भाषा अनेकदा करण्यात आली आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांनीही गेल्या काही वर्षांत ट्रम्प यांच्याविरोधातील कथित इराणी कटांबाबत माहिती दिली होती. जुलै २०२४ मध्ये बटलर येथील प्रचारसभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेत गोळी त्यांच्या कानाला स्पर्श करून गेली होती.

चर्चेसाठी इराणची विनंती

ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने अमेरिकेसोबत चर्चा सुरू ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, दोन्ही देशांतील युद्धबंदी संपुष्टात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिका-इराण संबंधांतील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यात जमीन घोटाळ्यावर मोठी कारवाई! १५ महसूल अधिकारी निलंबित; फौजदारी गुन्हे दाखल होणार

Donald Trump News, Trump Iran Warning, US Iran Conflict, World News Marathi, International News

आपलं सरकार

Click to listen highlighted text!