Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास परवानगी

Advertisements
Advertisements
Spread the love

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली अंगमो यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत दिल्ली उच्च न्यायालय आणि त्यांच्या कायदेशीर पथकाचे आभार मानले आहेत.

Advertisements

डॉ. गीतांजली अंगमो यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांना आमच्या पसंतीच्या मेदांता रुग्णालयात हलवण्याचा अनुकूल आदेश दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. तसेच ज्येष्ठ वकील अखिल सिब्बल, बहुली शर्मा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही विक्रमी वेळेत ही कायदेशीर लढाई जिंकल्याबद्दल आभार.”

Advertisements
Advertisements

पत्नीच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली अंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी नाकारलेल्या एकल न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

या अपीलावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली.

प्रकृतीवर मेदांता रुग्णालयात उपचार

गेल्या काही दिवसांपासून उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यांच्या उपचारांसंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!