#CurrentNewsUpdate | संजय राऊत यांना जामीन मंजूर

संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
राऊत यांना पत्रावाला चाळ प्रकरणी 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले. पण त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. मात्र, आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संजय राऊत माध्यमांसमोर येऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.न्यायालयात जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी ‘हौसले बुलंद है’ अशी प्रतिक्रिया दिली होती.
राऊत अटक आणि जामीन, कधी काय?
-
31 जुलै : संजय राऊतांना ईडीकडून अटक, सुरुवातीला राऊतांची ईडी कोठडीत रवानगी.
-
8 ऑगस्ट : पीएमएलए कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. संजय राऊतांची आर्थर रोड कारागृहात रवानगी
-
7 सप्टेंबर : पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला.
-
2 नोव्हेंबर : राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
-
9 नोव्हेंबर : संजय राऊतांना जामीन मंजूर
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीझरवर एफआयआर
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी