‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या टीझरवर एफआयआर
काश्मीर फाईल्सनंतर आता सध्या चर्चेत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=udoCRDjqxv8
विपुल अमृतलाल शाह यांचा आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या टीझरवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Kerala DGP directed Thiruvananthapuram city police commissioner to register FIR on the teaser of the movie 'The Kerala Story'. This was based on a complaint sent to CM. High Tech Crime Enquiry Cell conducted a preliminary enquiry & report was sent to DGP: Kerala Police
— ANI (@ANI) November 8, 2022
द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनी केली असून सुदिप्तो सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असे म्हंटले जात आहे. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की एका मुलीचे घरातून अपहरण करण्यात येते आणि तिचे धर्मांतर करून तिला आयएसआयएस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद केले जाते. एका सामान्य मुलीला दहशतवादी बनवण्यात येते. ती एकटीच नव्हे तर अशा ३२,००० महिलांना तेथे आणून दहशतवादी बनवण्यात आले आहे असा खुलासा ती टीझरमध्ये करत आहे. टीझरमध्ये एका महिलेची कहाणी पाहायला मिळते. ही भूमिका अदा शर्मा साकारताना दिसत आहे.
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी